Home बीड बीड जिल्ह्यामध्ये १०२ परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

बीड जिल्ह्यामध्ये १०२ परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_101144.jpg

बीड जिल्ह्यामध्ये १०२ परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:२१  रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील १०२ परीक्षा केंद्रावर ४१०५२ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. केंद्रावर अनुचित प्रकार रोखण्यासाठी विविध पथकाची करडी नजर होती. केंद्रनिहाय महसूलचे बैठे पथक होते. तसेच जिल्हास्तरावरून सहा भरारी पथकांची जिल्ह्याभरातील परीक्षा केंद्रावर नजर होती. तसेच कॉफी रोखण्यासाठी जिल्ह्याभरातील परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचनाही पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या असल्याने यामुळे परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशीन परीक्षेच्या वेळापुरत्या बंद होत्या त्याचबरोबर बीड येथे स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत. तसेच यावर्षी परीक्षेच्या वेळात दहा मिनिटे वेळ जास्त मिळाल्याने विद्यार्थ्यांचे टेंशन कमी झाल्याचे दिसून येत आहे व जिल्ह्यातील अकरा तालुक्यात महसूलचे बैठे पथक आणि भरारी पथक केंद्रनिहाय फिरते राहणार असून या फिरत्या पथकामुळे ग्रामीण भागातील केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखले जाणार आहेत. परीक्षा केंद्रावर शहरी भागासह ग्रामीण भागातील परिक्षा केंद्रावर देखील पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहावयास मिळाला यामुळे जिल्ह्याभरातील परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here