Home नांदेड भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी –...

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0050.jpg

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीबाबत दुसरे प्रशिक्षण संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड (जिमाका) दि. 18 :-05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रीयेत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दक्षता घेवून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रीयेत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी करावयाच्या प्रक्रियेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप जिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकुळे, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसिलदार राम बोरगावकर व निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व तालुक्याचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

ही निवडणूक जिल्ह्यातील 30 मतदान केंद्रावर होत असून यासाठी प्रत्येक केंद्रावर 4 याप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. ही निवडणूक प्रक्रीया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशिवाय होत आहे. मतपत्रिका व बॅलेट नुसार ही निवडणूक प्रक्रीया होत असल्याने निवडणूक कामात नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपुर्वक कामकाज करावे असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. तसेच निवडणूकीत मतदारांना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत यावेळी माहिती दिली.

या निवडणूक प्रक्रीयेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी निवडणूकीच्या एक दिवस अगोदरपासून ते मतदान प्रक्रिया संपूर्ण होईपर्यत करावयाच्या कर्तव्याबाबत तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी मतदानाची पध्दत, मतदान पध्दतीबाबत मार्गदर्शक सूचना, कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, मतपत्रिका व मतदान याद्या तपासणी, मतदानाच्या दिवशी अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक साहित्य ताब्यात घेताना घावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

तसेच मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक राहील. मतदान सुरु होण्यापूर्वी तसेच मतदान संपल्यानंतर मतपेटी व इतर मतदानाचे साहित्य हाताळण्याबाबत चे प्रात्यक्षिक यावेळी करुन दाखविले. या प्रशिक्षणास अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतपेटी हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र वितरीत केले.

Previous articleनागरीकांच्या तक्रारींवर जलदगतीने कार्यवाही करावी-विभागीय आयुक्त गमे
Next articleसटाणा मालेगांव रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले; रोकड लंपास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here