Home नाशिक सटाणा मालेगांव रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले; रोकड लंपास

सटाणा मालेगांव रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले; रोकड लंपास

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0051.jpg

सटाणा मालेगांव रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले; रोकड लंपास

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

सटाणा येथील मालेगांव रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटिएम अवघ्या काहि मिनिटांत फोडून १३ लाख ७७ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरचे एटिएम यापूर्वी फोडण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तिस-या वेळेस चोरट्यांकडून काही मिनीटातच एटीएम फोडण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील स्टेट बँकचे एटीएम कटरच्या साह्याने फोडले. बँकेचे शाखा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएम मध्ये १२ जानेवारी रोजी १३ लाख ७७ हजार रूपयांचा रोख भरणा करण्यात आलेला होता. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रभारी पोलिस अधिकारी किरण पाटील गस्त घालत असतांना १ वाजून | ३५ मिनीटाच्या सुमारास मालेगांव कडे जात असताना एटीमचे शेटर उघडे होते. परतीच्या प्रवासात २ वाजून १५ मिनिटांच्या वेळेत शेटर बंद असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास येताच संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली त्यांनी चालकाला गाडी थांबवण्याची सुचणा करून गाडीतील सहका-याच्या सहाय्याने शेटर उघडले असता एटीएम फुटल्याचे आढळले. तातडीने त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळवून परिसरातील पोलिस स्टेशनला नाकाबंदी करण्याच्या सुचना केल्या.
सकाळी बँकेचे अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी व सटाणा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी किरण पाटील व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरण ताब्यात घेतले. दिवसभर उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी सटाणा पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. मालेगांव रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू होते. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे कडवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. सटाणा पोलिसांनी अज्ञात चोट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही महिन्यापासून मालेगांव रोड परिसरात एटीएम फोडण्यासह घर फोडीच्याही अनेक घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी मालेगांव रोड टार्गेट केल्यामुळे येथील रहिवासी
भागांमधील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून बँकेने कायमस्वरूपी हत्यारबंद सुरक्षारक्षकांची नेमणुक करावी अशी मागणी परिसरातुन होत आहे.
सटाणा शहरात गेल्या वर्षभरात अनेक घरफोड्या, दुचाकी वाहाणांच्या चोरीचे प्रकार वाढल्यामुळे शहरातील नागरीक अनेक दिवसांपासून घबराटीच्या दहशतीखाली वावरत आहेत. बदलून गेलेल्या पोलिस निरीक्षकांच्या मागदर्शनाखाली चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. सटाणा पोलिस स्टेशन मध्ये गेल्या 15 दिवसांपासून पोलिस निरीक्षकांची जागा रिक्त असून सर्व भार दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकांवर आहे. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांची नेमणुक करतांना कर्तव्य दक्ष तरुण तडफदार उत्साही अधिका-याची नेमणुक सटाणा पोलिस स्टेशनमध्ये करावी अशी मागणी शहरातील व्यापा-यांसह विविध बँका, पतसंस्था व सर्व सामान्य नागरीकांना कडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here