• Home
  • नांदेड येथे आज पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५२ वर, तर दिवसभरात ३ रुग्णांची भर, तसेच दोन चिमुकल्यांचाही समावेश*

नांदेड येथे आज पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५२ वर, तर दिवसभरात ३ रुग्णांची भर, तसेच दोन चिमुकल्यांचाही समावेश*

*नांदेड येथे आज पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५२ वर, तर दिवसभरात ३ रुग्णांची भर, तसेच दोन चिमुकल्यांचाही समावेश*
*नांदेड, दि २ राजेश एन भांगे*
जिल्ह्यातील मंगळवार दिनांक 2 जून 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 67 अहवालापैकी 60 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन 3 रुग्णांचे स्वॉब पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 152 एवढी झाली आहे.

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या तीन पॉझिटिव रुग्णांपैकी 1 मुलगी वय वर्ष 7 व 1 एक मुलगा वय वर्षे 4 आहेत, सदरील दोन्ही रुग्ण हे लोहार गल्ली नांदेड येथील असून, 1 रुग्ण पुरुष वय वर्ष 55 कुंभार टेकडी सराफा बाजार नांदेड शहरातील आहे. या सर्व रुग्णांवर पंजाबभवन कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

आज दिनांक 2 जुन 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील, एक रुग्ण बरा झाल्यामुळे त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 152 रुग्णांपैकी 121 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 8 रुग्णांचा उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे, तर 2 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण फरार झाले आहेत, उर्वरित 23 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 3 रुग्णांपैकी 2 स्त्री रुग्ण ज्यांचे वय 52 व 65 व 1 पुरुष रुग्ण ज्याचे वय 38 वर्ष त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे तर एका रुग्णाला उपचारासाठी मुंबई येथे संदर्भित करण्यात आले असून उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

सोमवार दिनांक 1 जून 2020 रोजी प्रलंबित असलेल्या 176 स्वॉब तपासणी अहवालपैकी 67 अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित 109 अहवालांचा रिपोर्ट आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल व दिनांक 2 जून 2020 रोजी 158 स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांचा अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील. असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 3 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ दिवसभरात एका रुग्णांला सुट्टी.

☑️ एकूण पॉसिटीव्ह रुग्ण संख्या 152 वर.

☑️ आत्तापर्यंत 121 बरे होऊन घरी.

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️8 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️23 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️1 संदर्भीत रुग्णांवर मुंबई येथे उपचार सुरू.

☑️ 2 महिला व एका पुरुष रुग्णांची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सदर माहीत २ जुन सायं ५ वा. प्राप्त नुसार.

anews Banner

Leave A Comment