Home नांदेड मन्याड नदीवरील नारनाळी येथील पूलांचे आज आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते...

मन्याड नदीवरील नारनाळी येथील पूलांचे आज आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन.

129
0

राजेंद्र पाटील राऊत

मन्याड नदीवरील नारनाळी येथील पूलांचे आज आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन….
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज मुखेड कंधार या तालुक्याना जोडणारा नारनाळी येथील पूलाचे भूमिपूजन आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मुखेड कंधार सीमेवर वाहणारी मन्याड नदी कंधार तालुक्यात जाण्यासाठी यापूर्वी दोन पुल कार्यान्वित आहेत. मात्र ते दोन्ही मार्गे मुखेडकरांना लांबचे ठरत होते. तसेच कंधार तालुक्यातील नागरिकांना त्यांच्याच तालुक्यातील नारनाळी येथे जाण्यासाठी मुखेड शहरातून जावे लागत होते. या पुलासाठी आजपर्यंत कोणीही प्रयत्न केले नव्हते. आमदार डॉ.तुषारजी राठोड यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यावर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाच्या बांधकामासाठी नाबाड २५ या योजनेअंतर्गत जवळपास पाच कोटी ६९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र या पूलाची मंजुरी महायूती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मिळाली व त्यानंतर निवडणुका लागल्या. त्यामुळे या पुलाचे बांधकाम रखडले गेले होते. ४ मे रोजी आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या हस्ते या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजनानंतर या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरच हा पूल पूर्णत्वास जाईल. आणि वाहतूक सुरू होईल. अशी आशा गावकऱ्यांनी बोलून दाखवली.

यावेळी उपस्थित सभापती मा.खुशालराव पाटील उमरदरीकर,सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ वीरभद्र हिमगिरे, उपसभापती पंजाबराव वडजे, डेप्युटी इंजिनिअर जोशी साहेब,गुत्तेदार नरेश पंचगे, मा.गिरीधारी केंद्रे,केशव पाटील,माधव कदम,नार नाळीकर कृषी अधिकारी,नारायण गायकवाड, गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य नामदेव पाटील वडजे, बालाजी पाटील वडजे,सुधीर चव्हाण
सदरील गावातील सरपंच,भुजंग देहारे व्हाईस सरपंच माधव उलगुलवाड ग्रामपंचायत सदस्य विकास. रायवडे, गणेश बीरू रघुनाथ यमुलवाड पोलिस पाटील जळबा रायवाडे शिवाजी बांदेवाड उमेश अडकीने, हनमंत अडकीने, नारायण सोमवरे, किसन धाडेकर, आदी मसलगा, नारनाळी, मादाळी,आदी ग्रामस्थ उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here