• Home
  • भारतीय बौद्ध महासभा नासिक जिल्हा पूर्व* मालेगांव ( प्रमोद पवार वृतसंपादक युवा मराठा न्युज)-

भारतीय बौद्ध महासभा नासिक जिल्हा पूर्व* मालेगांव ( प्रमोद पवार वृतसंपादक युवा मराठा न्युज)-

*भारतीय बौद्ध महासभा नासिक जिल्हा पूर्व*
मालेगांव ( प्रमोद पवार वृतसंपादक युवा मराठा न्युज)-
*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले *’राजगृह’* वर काल दिनांक-7-7-2020 रोजी संध्याकाळी 5 वाजता.दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड,झाडांच्या कुंड्या तोडण्यात आल्या तसेच घराच्या काचांवरही दगडफेक केली.
अशा हरामखोर माथेफिरूना तात्काळ अटक करावी व त्या मांगचा मुख्यसूत्रधार कोण याची सखोल चौकशी करावी..
अशा अशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी याना देण्यात आले.
जर शासनाने तात्काळ कार्यवाही नाही केली आणि मुख्य सूत्रधार यांचा शोध नाही लावला तर भारतीय बौद्ध महासभा तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला.
निवेदन सादर करताना सतिष गांगुर्डे, सरचिटणीस नासिक जिल्हा पूर्व, जयवंत निकम , कोषाध्यक्ष, वाल्मीक कापडे उपाध्यक्ष संस्कार नासिक जिल्हा पूर्व, राजेंद्र पवार, तालुकाध्यक्ष, रविद्र निकम मालेगाव शहर अध्यक्ष, नितीन बागुल सरचिटणीस मालेगाव शहर,डॉ.मोतीराम पान पाटील, वाल्मीक देवरे, हिरामण अहिरे.माणिक कटयारे,आनंद मैराळे, दादाजी वाघ, गौरव थोरात, दीपक यशोद.काविताताई बागुल, सिद्धार्थ शेजवळ पत्रकार,
आदी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment