Home उतर महाराष्ट्र क्रुसाच्या वाटेची भक्ती….

क्रुसाच्या वाटेची भक्ती….

60
0

आशाताई बच्छाव

IMG_20240326_090430.jpg

क्रुसाच्या वाटेची भक्ती….
उपवास काळातील धार्मिक भाग म्हणून क्रुसाची वाटेची भक्ती केली जाते.त्याप्रमाणे श्रीरामपूर येथील लोयोला सदन,लोयोला दिव्यवाणी,संत विन्सेंट चर्च आगाशे नगर यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र क्रुसाची वाट सोमवार दिनांक २५/०३/२०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता श्रीरामपूर लोयोला सदन येथून निघाली.नंतर पुढील १४ स्थाने घेतली गेली.त्यामध्ये सुरूवातीची भक्ती लोयोला चर्च श्रीरामपूर,पहिले स्थान पवित्र क्रुस तीर्थ क्षेत्र करूणा माता चर्च वैजापूर,दुसरे स्थान संत फ्रॉन्सिस झेवियर चर्च मनमाड, तिसरे स्थानाची भक्ती करूणा हाॅस्पिटल मनमाड, चौथे स्थान संत झेवियर हायस्कूल मनमाड याठिकाणी, पाचवे स्थान संत विन्सेंट चर्च येवला, सहावे स्थान सेंट मेरी चर्च कोपरगाव येथे, सातवे स्थान सेवानिकेतन चर्च कोपरगाव,आठवे स्थान होली फॅमिली चर्च कोपरगाव येथे, नववे स्थान माऊंट फोर्ड स्कूल सावळी विहीर,दहावे स्थान संत फ्रॉन्सिस झेवियर चर्च राहाता, अकरावे स्थान निष्कलंक माता चर्च प्रवरानगर, बारावे स्थान बाळ येशू चर्च बाभळेश्वर, तेरावे स्थान सेंट विन्सेंट चर्च (डि पाॅल स्कूल) आगाशे नगर याठिकाणी आणि शेवटचे चौदावे स्थान लोयोला दिव्यवाणी नॉर्दन ब्रॅच श्रीरामपूर याठिकाणी क्रुसाच्या वाटेची भक्तीचा सांगता करण्यात आला.याप्रसंगी श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.ज्यो गायकवाड,सेंट विन्सेंट चर्चचे रे.फा. थॉमस व फा .संजय ब्राह्मणे .फा . सयाराज फा मायकल. ब्रदर जोसेफ.फा. गिल्बट फा.अनिल चक्रनारायण फा. मॅथ्यू तसेच रविंद्र लोंढे व दिपक कदम नितिन जाधव प्रमोद संसारे यांनी उत्कृष्ट पध्दतीने नियोजन केले होते.या धार्मिक क्रुसाच्या वाटेची भक्तीच्या सोहळ्यात जवळजवळ ७० स्त्री व पुरूषांनी सहभाग घेतला होता.यासाठी सेंट विन्सेंट चर्चचे प्रमुख धर्मगुरू यांनी यासर्व प्रवासासाठी बस दिली होती त्यांचे विशेष आभार.

Previous articleविद्यार्थी आत्मविश्वास दिन
Next articleहिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्ताचा विशेष उल्लेख
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here