आशाताई बच्छाव
मालेगावात जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न मालेगांव,(आंशूराज पाटील प्रतिनिधी)- मालेगांव शहरातल्या हरीकेश लॉन्स,दौलती शाळेजवळ,मालेगाव येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली . स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केशर जलतरण तलावाचे संचालक श्री.बापू मोरे, मा.चेतन मोरे ,मा.नारायण पवार साहेब, मा.तुषार देसले, मा. पवन भामरे,मा. समीर सोनवणे ,मा. अमित विसपुते मा. प्रीतम बत्तासे मा. दिनेश अहिरे इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.२८ मे रोजी सकाळी ९:३० वाजता वयोगट ४ वर्षापासून ते पुढील कोणत्याही वयोगटाच्या मुले व मुलींकरिता / पुरुष व महिलांकरिता १) फ्री स्टाईल (FREE STYLE)
२) ब्रेस्ट स्ट्रोक ( BREAST STROKE) ३) बॅक स्ट्रोक ( BACK STROKE) ४) बटर फ्लाय (BUTTER-FLY) या प्रकाराकरिता अंतर :- (१५ मीटर,२५ मीटर,५० मीटर,१०० मीटर पोहणे असे ठेवण्यात आले होते.मालेगांव तालुका स्विमिंग असोशियशन आणि खैरनार स्पोर्ट क्लब मालेगाव यांचे संयुक्त विद्यमाने हा स्पर्धचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा.नितीन खैरनार (एन.आय.एस.कोच) लाईफ गार्ड ट्रेनर तसेच गौरव जगताप,चंद्रशेखर जाधव आदित्य खर्जे , अभिजित निकम यांनी काम बघितले






