Home गडचिरोली वांगेपल्ली गावातून जाणाऱ्या जड़ वाहनांना बंद करा

वांगेपल्ली गावातून जाणाऱ्या जड़ वाहनांना बंद करा

140
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230529-082420_WhatsApp.jpg

वांगेपल्ली गावातून जाणाऱ्या जड़ वाहनांना बंद करा

आविसंचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार व उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करू   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी तालुक्यातील वांगेपली गावातून दररोज जड़ वाहन आलापली ते अहेरी मार्गावरून तेलंगाणा व तेलंगाणावरून वांगेपली मार्गी जड़ वाहतूक जात असून गावातील रस्ते खराब होत आहेत तसेच नागरिकांना व व्यापाऱ्याना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामूळे सदर रस्त्यांवरील जड़ वाहन बंद करावे अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा प.स.अहेरी अंतर्गत येणाऱ्या ग्रा.प.वांगेपल्ली येथील सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील नागरीकांनी दिली आहे.प्राप्त माहिती नुसार सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे येत असून या रस्त्यांवर जड़ वाहनांना वाहतुकीस या मार्गावरून रहदारी करण्यास प्रवेश बंदी असतो,मात्र जड़ वाहन सुरू असल्याने खड्डे पडून रस्ता खराब होत आहे, व अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावं लागत आहे त्यामूळे सदर रस्त्यावरून जड़ वाहन बंद करावे.व काही दिवसापूर्वी या मार्गांवर जड़ वाहतुकीस बंदी असल्याचं फलक लावण्यात आले आहे.तरी जड वाहतूक अद्याप बंद झालेले नाही.करीता वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,उपसरपंच राजेश कोतपल्लीवार,सदस्य संजय आत्राम,कल्पना मडावी,प्रियंका तोडसाम,निलेश आलाम,दुर्गे,संतोष येरमे,महेश नैताम, बाबुराव नागपुरे,ईश्वर सिडाम, व गावकरी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन सदर मार्गावरील जड़ वाहतुकीस बंद करण्याच्या निर्देश देण्यात यावी अन्यथा आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार व आविसं नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजमा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा नागरिकांडून देण्यात आला.

Previous articleवनमजूर , वनरक्षक व वनपाल यांच्या बैठकीत मागण्या मान्य.
Next articleमालेगावात जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here