Home युवा मराठा विशेष ऑगस्ट महिन्यात सण-उत्सवामुळे सुट्ट्यांची रेलचेल; महाराष्ट्रात 11 दिवस बँका बंद असणार, पहा...

ऑगस्ट महिन्यात सण-उत्सवामुळे सुट्ट्यांची रेलचेल; महाराष्ट्रात 11 दिवस बँका बंद असणार, पहा सुट्यांची लिस्ट

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220725-WA0003.jpg

ऑगस्ट महिन्यात सण-उत्सवामुळे सुट्ट्यांची रेलचेल; महाराष्ट्रात 11 दिवस बँका बंद असणार, पहा सुट्यांची लिस्ट

‘आँगस्ट महिना  खास आहे. भारत सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. तसेच ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो तो गणेशोत्सव देखील या महिन्यात येत आहे. संपूर्ण राज्यात गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. या महिन्यात अनेक सण-उत्सव असल्यामुळे सुट्ट्यांची रेलचेल असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्टमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

पुढील महिन्यात दुसरा आणि चौथ्या शनिवार धरून तेरा दिवस बँका बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थीसारखे मोठे सण याच महिन्यात येत आहेत. तुम्ही एखादं काम पुढील महिन्यात करण्यासाठी पुढे ढकललात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. हे बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे असतात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे बँकांशी संबंधीत काही काम असेल तर ते नियोजन करून उरकावे लागणार आहे.

ही आहे सुट्ट्यांची यादी…

1 ऑगस्ट: द्रुपका शे-जी उत्सव (फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.)

7 ऑगस्ट: 2022 – पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)

8 ऑगस्ट: मोहरम (फक्त जम्मू आणि काश्मीरमधील बँका बंद राहतील)

9 ऑगस्ट: मोहरम (अगरतळा, अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद राहतील.)

11 ऑगस्ट: रक्षा बंधन (देशभरात सुट्टी)

13 ऑगस्ट: दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

14 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट: पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)

18 ऑगस्ट: जन्माष्टमी (देशभर सुट्टी)

21 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

28 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

31 ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)

या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगांवर आहेत. काही ठिकाणी सण साजरे करण्याचे दिवस बदलतात. यानुसार हे बदल असतात.

Previous article🇮🇳 हर घर तिरंगा, घर घर तिरंगा 🇮🇳 .
Next articleदेशमुख समाजातील गूणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख महिला मंडळ अकोला कौतूकाची थाप सत्कार व पुरस्कार वितरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here