Home अमरावती अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग विभागाने१४६ बोगस दिवंग प्रमाणपत्र केले रद्द.

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग विभागाने१४६ बोगस दिवंग प्रमाणपत्र केले रद्द.

75
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230529-183657_WhatsApp.jpg

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग विभागाने१४६ बोगस दिवंग प्रमाणपत्र केले रद्द.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
जन्मताच किंवा अपघाती दिवंगत्व आलेल्या व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे हे बंधनकारक आहे. त्यामुळे दलालाच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांना चांगली चपराक बसली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग विभागाने आतापर्यंत १४६ बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली जिल्हा सामान्य रुग्णालय (ईरवीन) येथे आठवड्यातील दर बुधवारी जन्मताच किंवा अपघाती दिवंगत्व आलेल्या रुग्णांचे आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीनंतर संबंधित व्यक्तीचे दिवंगत्व किती टक्के आहे हे ठरवून त्याला प्रमाणपत्र दिले टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ दिला जातो. हा लाभ मिळवण्यासाठी अनेकांनी दलालाच्या माध्यमातून बोगस दिवंगत प्रमाणपत्र काढण्याची दिसून येत आहे .प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केल्याने ही प्रकरणे बाहेर आल्याची दिवंग विभागाचे म्हणणे आहे.२०१६ते एप्रील२०२३ पर्यंत सुमारे ५७ हजार नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली.यात३८ हजार नागरिकांच्या तपासणीनंतर १२ आजाराच्या जवळपास नागरिकांची नोंदणी ही चुकीच्या पद्धतीने झाल्याचे लक्षात आले. तर, उर्वरित नागरिक हे नोंदणी करूनही तपासणीसाठी आलेच नाहीत.तर, यात१४६ दिवंग्याकडे बोगस प्रमाणपत्र देखील आढळून आणल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यांना मिळते दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग्याचे एकूण २१ प्रकार आहे. यामध्ये दृष्टिहीन, कर्णबधिर, शारीरिक दिवंगता, बहु दिवंगता, शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, पक्षघात, स्नायू ची योग्यता, स्नायूची विकृती, मज्जा संस्थेचे जुने आजार, अध्याय अक्षमता, वाचा भाषा दोशी, थॅलेसिमिय हिमोफिलिय, सिकल सेल आजार, कुष्ठरोग यासारख्या आजाराचा समावेश होतो. काही वर कारवाई १४६ बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मध्ये काहींच्या प्रमाणपत्रावर खोट्या सह्या, रुग्णालयाचे खोटे शिक्के आढळून आले. तर काहींनी दिव्यांग्याचे टक्केवारी वाढून घेतलेचे लक्षात आल्याने त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. काही बोगस प्रमाणपत्र धारका विरोधात तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई देखील केली आहे. दर बुधवारी दिवंग्याची तपासणी केली टक्क्यापेक्षा जास्त दिवंगत असणारांनाच प्रमाणपत्र दिले जाते. नोंदणी ऑनलाइन असल्याचे आता बोगस प्रमाणपत्र धारकावर बसली आहे असे डॉक्टर नरेंद्र सोळंके सामान्य रुग्णालय ईर्विन अमरावती यांनी ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here