• Home
  • 🛑 शरद पवार आहेत काहीही घडवू शकतात…! राणेंच्या विधानाने चर्चांना उधान 🛑 ✍️ मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 शरद पवार आहेत काहीही घडवू शकतात…! राणेंच्या विधानाने चर्चांना उधान 🛑 ✍️ मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 शरद पवार आहेत काहीही घडवू शकतात…! राणेंच्या विधानाने चर्चांना उधान 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सोबत येण्यासाठी थेट शरद पवारांनीच ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रवादीकडून ऑफर होती अजित पवारांकडून नाही अस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

यावर आता नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. नारायण राणे यांनी यावरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
‘ते आता हे देवेंद्र फडणवीसांना माहिती असेल. पण देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात लक्षात ठेवावं शरद पवार हे जेव्हा प्रस्ताव देतात तेव्हा ते एकाच पक्षाला देतात का? यावर विश्वास ठेवावा इतपत विश्वास ठेवावा. पण आता ही गोष्ट इतिहास जमा झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी समर्थपणे याची उत्तरं दिलेली आहेत’. अस नारायण राणे म्हणाले आहेत.

तर, सरकारबद्दलचे किंवा राजकीय प्रस्ताव जे येतात ते आपल्यालाच दिले असतील यावर विश्वास ठेवून पुढे जाऊ नये असं मला वाटतं. ते शरद पवार काहीही घडवू शकतात हे मला माहिती आहे.

अस वक्तव्य नारायण राणे यांनी केल आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, राज्य चालवण्याचा कुठलाही अनुभव मुख्यमंत्र्यांना नाही. सरकारमध्ये आपसात मतभेद आहेत. त्यामुळं सरकारी यंत्रणांवर अंकुश नाही. घरात बसून आदेश काढले जातात. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी आजवर पाहिला नाही, असा टोला भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment