• Home
  • अँटी करपशन ब्युरो टीम चे स्टिंग ऑपरेशन,, लाच घेताना सापडले कृषी अधिकारी

अँटी करपशन ब्युरो टीम चे स्टिंग ऑपरेशन,, लाच घेताना सापडले कृषी अधिकारी

अँटी करपशन ब्युरो टीम चे स्टिंग ऑपरेशन,, लाच घेताना सापडले कृषी अधिकारी. (सुरगाणा तालुका प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड )
मा. मोनिका सुरेश पवार सरपंचग ग्रुप ग्रामपंचायत खोबाळा (मानी )यांच्या मार्गदर्शनाखाली T.S.P.विहीर लाभार्थी श्री. मुरलीधर नारायण गावित राहणार गणेशनगर (धुरापाडा )पोस्ट मानी ता. सुरगाणा यांनी अँटी करपशन ब्युरो टीम च्या मदतीने सुरगाणा तालुक्याचे कृषी अधिकारी
श्री. मगर यांना वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. या भ्रष्ट अधिकाऱ्याला पकडून दिल्याबद्दल शेतकऱ्याचं अभिनंदन करण्यात आलं.
तसेच या अधिकाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केली असल्यामुळे उपसभापती मा. इंद्रजित गावित यांनी चांगलाच मार दिला. अधिकाऱ्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्येमातून किती संपत्ती मिळवली आहे. याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी गावित यांनी केली.

anews Banner

Leave A Comment