Home कोकण रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन किनाऱ्यावर संशयापद बोटी आढळल्या! रा

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन किनाऱ्यावर संशयापद बोटी आढळल्या! रा

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0058.jpg

पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन किनाऱ्यावर संशयापद बोटी आढळल्या! रायगड जिल्ह्यात,श्रीवर्धन समुद्रालगत दोन समस्यास्पद बोटी आढळल्या. हरिहरेश्वर, भरडखोल मध्ये दोन संशयित बोटी आढळल्याने एका बोटीमध्ये हत्यारे आढळल्याची माहिती सांगितली जात आहे. त्या बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल आढळल्याची माहिती आहे तसेच 225 लाईफ करतोस मिळाले आहेत .ही बोट लंडन या ठिकाणचे आहे असे संशय आहे. या बोटीमध्ये पाण्याच्या बाटल्या, खाण्याचे सामान हेही आढळले. पोलिसांनी दोन इंडोनेशियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे.. त्या बोटीमध्ये महत्त्वाचे कागदपत्रे मिळाली त्यानुसार ती बोट ब्रिटनमध्ये रजिस्टर आहे असे समजले जाते. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. त्यांना संशय असा आहे की पूर्वी जसा समुद्रमार्ग हल्ला झाला होता. तसेच १९९३ चा बॉम्बस्फोट घडला होता त्याचप्रमाणे काही घातपात करण्याचा प्रयत्न होता का असे संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.२६/११ चे पुनरावृत्ती होती का? असाही संशय या ठिकाणी व्यक्त होत आहे .रायगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी राज्य सरकार ची यंत्रणा एटीएस यांनी लवकरात लवकर सूत्र हाती घेऊन पुढील सखोल तपास करावा अशी त्यांना विनंती केली आहे .या बोटीवर नेपच्यून मेरीटाईम सिक्युरिटी या नावाचे स्टिकर सापडले आहे. त्याचबरोबर संगणकही सापडले आहेत असे रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे. स्वातंत्र टीम नेमून तातडीने चौकशी करावी व एटीएस बरोबर केंद्रीय यंत्रनाही याच्याबरोबर सहभागी होऊन उपाययोजना कराव्यात असे यांना वाटते. त्या बोटी मधून वामन नागरिकांना रेस्क्यू केला होता परंतु खूप मोठ्या लाटा असल्याने ती बोट वाहत वाहत आपल्या किनाऱ्यावर आली असे संशय होत आहे. केंद्रीय यंत्रणा तसेच महाराष्ट्रातील एटीएस यंत्रणा या दोन्हीही या संशयापद बोटीसाठी पुढील तपास करत आहेत त्याला त्याने सुरुवात केली आहे.

Previous articleअभिजित हेगशेटये यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Next articleनांदगांव तालुक्यातील तांदुऴवाडी शिवारात अज्ञात तरुणाचा खुन               
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here