Home अमरावती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची अमरावती विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची अमरावती विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक

105

आशाताई बच्छाव

IMG_20240121_084319.jpg

अमरावती,(दिपक कदम प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची अमरावती विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक काँग्रेस भवन, अमरावती येथे आज पार पडली. या बैठकीस काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला जी यांनी उपस्थित राहून अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम, बुलढाणा यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूकी संदर्भात आढावा घेतला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार श्री. नानाभाऊ पटोले यांनी या विभागीय बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भातील सर्वच्या सर्व जागी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री यशोमतीताई ठाकुर, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्यासह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटलचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Previous article मुंबईत ग्राहक सेवा संस्थेच्या  नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
Next articleशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदैव प्रयत्नशील राहणारे कार्यक्षम नेतृत्व : ‘सत्यजीत तांबे’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.