Home नांदेड कर्नाटकच्या भरधाव बसने मेंढारास चिरडले देगलूर नांदेड महामार्गावरील टाकळी जवळील घटना

कर्नाटकच्या भरधाव बसने मेंढारास चिरडले देगलूर नांदेड महामार्गावरील टाकळी जवळील घटना

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0032.jpg

कर्नाटकच्या भरधाव बसने मेंढारास चिरडले देगलूर नांदेड महामार्गावरील टाकळी जवळील घटना

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

 

आदमपूर: कर्नाटक राज्यातील महामंडळ बसने देगलूर तालुक्यातील वझरगा येथील एका मेंढपाळाच्या मेंढरा च्याकळपास देगलूर नांदेड महामार्गावरील बिलोली तालुक्यातील टाकळी शिवारात धडक दिल्याने एक गाबन असलेले मेंढरी जागीच ठार झाली तर दहा मेंढरे जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की ता.६ रोजी सकाळी १० वाजता देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मेंढपाळ ज्ञानेश्वर गोविंद कोकणे हे आपले मेंढराचे कळप घेऊन बिलोली तालुक्यातील टाकळी शिवारात मेंढरं चारवत होते, चारवत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे देगलूर नांदेड महामार्ग रस्ता ओलांडत असताना त्याच वेळी कर्नाटक राज्यातील महामंडळ बस क्रमांक के ए ३८ एफ १०१३ या बस वाहन चालकाच्या निष्काळजीपणाने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवीत सदरील मेंढ्याच्या कळपाला जोरदार धडक दिली त्यात एक गाभण असलेली मेंढरी बसच्या टायर खाली येऊन चेंदामेंदा होऊन तिच्या गर्भातील बछडा बाहेर पडला व इतर दहा मेंढ्यांना दुखापत होऊन अंदाजे मेंढपाळ याचे २३ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याने मेंढपाळ यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आदमपूर बीट जमादार अशोक इंगळे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here