Home नाशिक शिक्षकांनी प्रमाणिकपणे काम करणाऱ्या संघटनांच्याच पाठिशी उभे राहावे-मान.संजय बबनराव पगार

शिक्षकांनी प्रमाणिकपणे काम करणाऱ्या संघटनांच्याच पाठिशी उभे राहावे-मान.संजय बबनराव पगार

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_204822.jpg

शिक्षकांनी प्रमाणिकपणे काम करणाऱ्या संघटनांच्याच पाठिशी उभे राहावे-मान.संजय बबनराव पगार

नाशिक तालुकाध्यक्ष विवेक खैरनार तर पेठ तालुकाध्यक्ष राजाराम वाघ

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग अक्षता लॉन्स , रासबिहारी लिंक रोड,नाशिक येथे राज्य कार्यवाह /सरचिटणीस मान.संजय बबनराव पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या मेळाव्यामध्ये नाशिक तालुकाध्यक्ष विवेक खैरनार यांनी प्रास्ताविकात शिक्षक परिषदेचे कार्य पारदर्शी व लढाऊ संघटना आहे तर मनोगत प्रमुख पाहुणे जिल्हा नेते रमेश गोहिल, दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, इगतपुरी तालुकाध्यक्ष वैभव उपासणी, सिन्नर तालुका नेते अनिल गडाख,चांदवड तालुका नेते भाऊसाहेब भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी जिल्हा नेते रमेश गोहिल,जिल्हा कोषाध्यक्ष सुनील आहिरे, कार्याध्यक्ष जितेंद्र खोर,रावसाहेब जाधव तालुकाध्यक्ष दिंडोरी,वैभव उपासनी तालुकाध्यक्ष इगतपुरी , त्र्यंबकेश्वर तालुका नेते महादु स्वामी ,तालुकाध्यक्ष संतोष शार्दुल,सिन्नर तालुका नेते अनिल गडाख, तालुकाध्यक्ष विलास मोरे,चांदवड तालुका नेते भाऊसाहेब भदाणे,तालुकाध्यक्ष महेन्द्र जाधव , रविंद्र ह्याळीज तालुका कार्यवाह यांनी मनोगत व्यक्त केले.राज्य सरचिटणीस/कार्यवाह संजय बबनराव पगार यांनी शिक्षक परिषदेने आज पर्यंत शिक्षक बदल्या,सेवा अधिनियम कार्यालयाबाहेर कार्य कालावधी बोर्ड लावणे,दिव्यांग न्याय लढा, केंद्र प्रमुख पदोन्नती आंदोलन तसेच निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले. शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, पोषण आहार योजना त्रयस्थ यंत्रणेकडून राबवावी शिक्षक यासंबंधीचे काहीही करणार नाही अन्यथा न्यायालयात जाणार,आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्यासाठी आंदोलन हाती घेणार, महिलांचे बदली,रजा प्रश्न, वस्ती शाळेतील शिक्षकांचे प्रश्न,फंड काढणे संदर्भात सुटसुटीत पद्धत कार्यान्वित करणे, जिल्हा परिषद नोकरीपुर्वी इतर संस्थेची सेवा गृहीत धरणे संदर्भात प्रश्न,स्थायित्व व हिंदी,भाषा सुट ,शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील.याप्रसंगी शशी पाटील यांचा निफाड तालुका कार्यकारीणीत समावेश करण्यात आला.तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विलास हाडस यांनी वेतन निश्चिती चे कार्य उत्कृष्ट केले.त्याबद्दल संजय पगार यांनी अभिनंदन केले.
प्रवेश -प्रशांत कोठावदे, गजानन मते यांची त्र्यंबकेश्वर सहकार्यवाह,जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ बोरसे
नाशिक तालुका -संजय बर्डे तालुका नेते, तालुकाध्यक्ष विवेक खैरनार, कार्यवाह स्वप्निल भोसले, कार्याध्यक्ष -प्रल्हाद भालेकर, कार्याध्यक्ष-प्रल्हाद भामरे, उपाध्यक्ष -विजयकुमार मते, सहकार्यवाह -अशोक आनेराव , महिला आघाडी डॉ.संजिवनी जगताप यांची निवड झाली.तर पेठ तालुका नेते संजय सोनवणे, तालुका अध्यक्ष राजाराम वाघ, तालुका सरचिटणीस/कार्यवाह दिनकर डगळे, कोषाध्यक्ष परशुराम कोर, उपाध्यक्ष अविनाश घोडके,भिमा तरवारे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष सुनील आहिरे, कार्याध्यक्ष जितेंद्र खोर,संघटक योगेश जाधव, सल्लागार मनोज कुमार सोनवणे, अरविंद हिरे,विष्णु मापारी,अशोक पवार (AT), सुभाष बर्डे,दादाजी आहिरे ,यशवंत भामरे, सुधाकर नाठे, कैलास पाटोळे,सुदाम बोडके, राहुल परदेशी, अनिल खैरनार,अरुण इंगळे, कैलास बांगर, विलास हाडस, शिवाजी भोसले,सुधाकर बाविस्कर, नानासाहेब साळकर,पिंटु गांगुर्डे, संतोष जाधव,प्रविण जाधव, गोपाळ देवर्षी, सखाराम सोनवणे,निंबा बच्छाव, प्रशांत चौटे, कार्याध्यक्ष- चंद्रशेखर उदावंत,दिपक मोरे, प्रदिप भावसार, विजयकुमार मते,अमोल सिंग परिहार, संतोष सुर्यवंशी, श्रीम.रंजना सोनवणे,रजनी दशपुते,भिमा तरवारे,संजय निकम ,संजय महाले आदी उपस्थित होते.
यांची निवड झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संतोष शार्दुल यांनी तर आभार पेठ तालुकाध्यक्ष राजाराम वाघ यांनी मानले.

Previous articleनांदेड दक्षिण मतदार संघातर्फे काँग्रेस ची बैठक.
Next articleनिवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश: टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविण्यासाठी ३ दिवसाचा अवधी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here