Home नाशिक पिंगळवाडे परिसरात सकाळ पासून संततधार

पिंगळवाडे परिसरात सकाळ पासून संततधार

103

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0011.jpg

पिंगळवाडे परिसरात सकाळ पासून संततधार
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सकाळपासून पिंगळवाडे व परिसरात संततधार सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण.
जून महिन्यात साधारण दोन वेळा चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत पेरणीचे काम पूर्ण केली होती. तसेच पेरणी ही शंभर टक्के पूर्ण झाली होती. पण मात्र अचानक पावसाने उघडीत दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. दुबार पेरणीची संकट येईल की काय असे वाटू लागले होते. त्यातच विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया जातील अशी शंका होती. परंतु दिनांक ८.७.२०२२ रोजी सकाळी पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. तसेच या पावसाचे स्वरूप संथधार असल्याने हा पाऊस विहिरींसाठी व पिकांसाठी उपयुक्त असा ठरत आहे. या पावसामुळे डोंगर माध्यावर गवताचे प्रमाण वाढेल त्यामुळे पाळीव प्राण्यांचा तुर्तास चाऱ्याचा प्रश्न मिटेल. शेतकऱ्यांना मध्ये एकीकडे पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे.परंतु या खरीप हंगामाच्या पिकांसाठी लागणारे रासायनिक खतांची कृत्रिम टंचाईला शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने या कृत्रिम खंत टंचाईला आळा घातला पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही असे बहुतांशी शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. संबंधित रासायनिक खत विक्रेत्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की संबंधित खत निर्मित करणाऱ्या कंपन्या यांच्याकडुन योग्य असा खत पुरवठा होत नसल्याने परिणामी आमच्याकडेही खत साठा शिल्लक राहत नाही. त्यामुळे परिणामी आमच्याकडून शेतकऱ्यांना खत पुरवठा होत नाही.

Previous articleमातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी संदीपदादा बेडसे च्या पाठपुराव्याला यश,जनतेनेही मानले आभार…
Next articleगावनिहाय सूक्ष्म कृती आराखड्यावर भर द्या – पालक सचिव एकनाथ डवले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.