• Home
  • सुरगाण्यात आमदारांनी घेतला पाणी टंचाई गावांचा आढावा

सुरगाण्यात आमदारांनी घेतला पाणी टंचाई गावांचा आढावा

*सुरगाण्यात आमदारांनी घेतला पाणी टंचाई गावांचा आढावा*.

सुरगाणा,(पांडूरंग गायकवाड प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- सुरगाणा तालुका म्हटला कि पाण्यासारख्या समश्येला खूप मोठया प्रमाणात सामोरे जावे लागते. २कि मी अंतरावरून पिण्याच्या पाण्याची जीव धोक्यात घालून व्यवस्था करावी लागते. सुरगाणा तालुक्याचे आमदार मा. श्री. नितिन भाऊ पवार यांनी तालुक्यातील म्हैसमाळ, गलवड, मोरडा, देवळा , दांडीचीबारी, खडकमाळ, पळशेत, तोरणडोंगरी, बाफळून, झुंडीपाडा, गावितपाडा, शिवपाडा, चाफावाडी यासारख्या पाणी टंचाई असणाऱ्या गावांना भेट देऊन तेथील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढील काळात पाण्याची समस्या कायमची दूर करू असे आश्वासन आमदारांनी येथील ग्रामस्थांना दिले. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आमदार मा. श्री. नितिन भाऊ पवार यांनी दिल्या. या वेळी सुरगाणा पंचायत समिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गायकवाड साहेब, झिरवाळ साहेब, चिंतामण गावित, गोपाळ धूम, तालुका अध्यक्ष राजू पवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment