• Home
  • १,६६६ पोलिस करोनाग्रस्त! दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण

१,६६६ पोलिस करोनाग्रस्त! दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण

 

⭕ १,६६६ पोलिस करोनाग्रस्त! दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण ⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबईसह: राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील पोलिस दलातील करोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १,६६६ इतकी झाली. दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण झाली आहे. करोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १७ इतकी आहे.
राज्यात करोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १४८३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्थलांतरित श्रमिकांची ने-आण, दररोजचा बंदोबस्त, तपासणी, चेकनाक्यावरील ड्युटी अशा विविध कामांत अडकून पडलेल्या पोलिसांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे.
विलेपार्ले, ठाणे येथेही मृत्यू
गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे करोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे.
४७८ जण करोनामुक्त
पोलिसांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही या विषाणूशी यशस्वी लढा देणाऱ्यांची संख्या ४७८ इतकी झाली आहे. करोनाची लक्षणे दिसताच या सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परिणामी ३५ पोलिस अधिकारी, ४३८ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत ‘लॉकडाउन’ कारवाईत वाढ
मुंबईत लॉकडाउन मोडणाऱ्यांविरोधातील कारवाईही वाढली असून, आत्तापर्यंत शहरात ६,७८९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अवैधरित्या सुरू करण्यात आलेली हॉटेले, पानटपऱ्या, इतर दुकाने, वाहतूक आदींविरोधातील दाखल गुन्ह्यांचाही समावेश आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचे बंधन न पाळणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जात आहे. अशांची संख्या १,२४० पर्यंत पोहोचली आहे.

anews Banner

Leave A Comment