Home महाराष्ट्र कोकण विभागातून ३.१५ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर रवाना !

कोकण विभागातून ३.१५ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर रवाना !

116
0
  • ⭕ कोकण विभागातून ३.१५ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर रवाना ! ⭕
  • नवी मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

नवी मुंबई : कोकण विभागातील विविध जिल्ह्‌यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांपैकी आतापर्यंत एकूण ३ लाख १५ हजार६०१ मजुरांना २२० विशेष रेल्वेगाड‌्यांनी त्यांच्या मुळराज्यात पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.

कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी  व सिंधुदुर्ग या जिल्हयांध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधील नागरीकांना त्यांच्या राज्यात अथवा मुळ निवासस्थानापर्यंत पोहचविण्यासाठी विशेष रेल्वे गाडया सोडण्यात आल्या. आतापर्यंत सोडलेल्या गाड‌्या व नागरिकांची संख्या अशी ठाणे २० गाडया २५ हजार ९९१ प्रवासी, पालघर २० गाडया ३२ हजार ४३२ प्रवासी, रायगड १७ गाडया २५ हजार ५३  प्रवासी, रत्नागिरी ४ गाड्या ५ हजार ७२ प्रवासी, सिंधुदूर्ग २ गाड‌्या ३ हजार ९१२ प्रवासींना त्यांच्या मुळ राज्यात  मुळ निवासस्थानी  पोहचविण्यात यश आले आहे. अजूनही विविध गाड‌्या सोडण्याचे शासनाचे नियोजन आहे.

पराराज्यातील नागरिकांना  ज्या राज्यात  जायचे आहे, त्या राज्यासाठी असलेल्या विशिष्ट फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती भरुन त्यांची माहिती संकलीत करण्यात आली आणि त्या माहितीच्या आधारे प्रवाश्यांच्या संख्येनुसार विविध राज्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या  सोडण्यात आल्या.  या गाडया सोडण्या आधी प्रत्येक प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच वैद्यकीय दृष्टया ज्यांचे आरोग्य सुदृढ आहे आणि ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशा प्रवाशांनाच या रेल्वे गाडयांमध्ये प्रवेश देण्यात आला.  गाडीत प्रवेश देण्याआधी सर्व प्रवाशांना  शासनाने ठरवून दिलेले सोशल डिस्टंन्सिंगचे नियम व कोरोना विषयीच्या सूचनांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.  त्यापैकी सर्वात जास्त प्रभावी अशी उपाययोजना म्हणजे लॉकडाऊन.  लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रादूर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे.  परंतु या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातून महाराष्ट्रात आलेले मजूर, कारागीर, विद्यार्थी, पर्यटक हे ज्या ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी अडकले होते. या पराराज्यातील अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळ राज्यात पाठविण्यासाठी आता शासनाने मुभा दिली आणि विशेष गाडीने त्यांना रवाना करण्यात आले, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.

Previous articleरेशन कार्ड नसले तरी ५ किलो तांदूळ मोफत मिळणार
Next article१,६६६ पोलिस करोनाग्रस्त! दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here