• Home
  • *प्रवासी क्षमता वाढवल्याने ३ *प्रवासी क्षमता वाढवल्याने ३१ हजाराने प्रवासी वाढले १ हजाराने प्रवासी वाढले* 

*प्रवासी क्षमता वाढवल्याने ३ *प्रवासी क्षमता वाढवल्याने ३१ हजाराने प्रवासी वाढले १ हजाराने प्रवासी वाढले* 

*प्रवासी क्षमता वाढवल्याने ३ *प्रवासी क्षमता वाढवल्याने ३१ हजाराने प्रवासी वाढले १ हजाराने प्रवासी वाढले*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज )*

राज्याने एस.टी.महामंडळाला
पूर्ण शंभर टक्के प्रवासाची मान्यता दिल्याने राज्यात पहिल्याच दिवशी काल एस.टी.ची प्रवासी संख्या ३१ हजार ४४६ ने वाढली आहे. राज्यात काल ४,५६५ बसेसद्वारे सुमारे १६ हजार फेऱया चालविण्यात येऊन ५ लाख २२ हजार १८४ प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर २० ऑगस्टपासून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळीत एसटीने ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू केली होती.
परंतू त्यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे तोटय़ात गेलेल्या महामंडळाला आणखीन फटका बसत होता. डिझेलचा वाढता खर्च आणि प्रवासी कमी त्यामुळे रोजचा खर्चही निघेना झाल्याने एसटी महामंडळ आणखीन तोटय़ात सापडले. त्यामुळे १८ सप्टेंबरपासून शंभर टक्के क्षमतेने बसेस चालविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. आदल्या दिवशी पन्नास टक्के प्रवासी क्षमतेने १७ सप्टेंबर रोजी राज्यात महामंडळाने ४४१० बसेसद्वारे चालविलेल्या १६,३४७ फेऱयांना ४लाख ९० हजार ७३८ प्रवासी होते. तर काल १८ सप्टेंबर रोजी शंभर टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार १८४ प्रवासी लाभले. म्हणजे पहिल्याच दिवशी एसटीला ३१ हजार ४४६ प्रवासी अधिक लाभल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाची जसजशी माहिती मिळेल तसतशी एसटीची प्रवासी संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

anews Banner

Leave A Comment