Home बुलढाणा लक्ष्यवेध संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून...

लक्ष्यवेध संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार तथा युवा मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांचा केला सत्कार..

170
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_060022.jpg

लक्ष्यवेध संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार तथा युवा मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांचा केला सत्कार..

ब्यूरो चीफ बुलढाणा
संग्रामपूर तहसील कार्यालयाला लागून असलेले लक्षवेध संघटनेच्या कार्यालयात दिनांक दि.०२/०२/२०२४ रोजी तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मानाचा कार्यक्रम संपन्न झाला तर उशिरा का होईना परंतु पत्रकार दिनाचे औचित्य साधून लक्षवेध संघटनेच्या संस्थापिका अध्यक्ष सौ नंदाताई पाऊलझगडे यांच्याकडून तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते, सामाजिक काम करत असताना लोकशाहीला मजबूत करण्यासाठी पत्रकार कायम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असतात परंतु राजकीय सामाजिक परिस्थिती बघता जे खेळी मेळीचे वातावरण निर्माण होत आहे त्या मध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय व हक्क आणि त्यांचा आवाज उचलण्याचे काम पत्रकार आपल्या लेखिनीच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असतात त्यामुळे आज लोकशाहीचा कणा पत्रकार आहेत,आणि पत्रकार दिन हा ६ जानेवारी पर्यंत मर्यादित नसून पत्रकार हे दिवस रात्र काम करीत असतात. अशे लक्ष्यवेध संघटनेच्या संस्थापिका अद्येक्षा सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी आजच्या कार्यक्रमात बोलताना आपले मत मांडले आणि सर्व उपस्थित पत्रकारांना भेट वस्तू व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच उपस्थीत पत्रकार वर्ग पत्रकार संघटनेचे अध्यक्ष केशवराव घाटे,
प्रल्हाद दातार, रामेश्र्वर गायकी, ज्ञानेश्वर पाटील दांदळे, युसुफ शेख, नंदकिशोर शिरसोले, विवेक राऊत, राजेंद्र धर्माधिकारी, सुनील ढगे, शेख रफिक, अनिलसिंग चव्हाण, उदेभान दांडगे,शेख कदिर भाई, मंगेश टाकसाळ, सुनील पाटील मुकुंद, विठ्ठल निंबोळकार, अमोल गाळकर , महादेव अजने सह बहुसंख्य पत्रकार बंधू उपस्थित होते.

Previous articleकुणबी मराठा महासंघ लोहा तालुकाध्यक्ष पदी अंबादास पाटील पवार यांची निवड
Next articleमोटरसायकल चोरी करणा-या आरोपीचे तामगाव पोलीसांनी आवळल्या मुसक्या!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here