• Home
  • 🛑आरक्षणाचा प्रश्न सोडवा नाहीतर….! मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे वळतील 🛑

🛑आरक्षणाचा प्रश्न सोडवा नाहीतर….! मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे वळतील 🛑

🛑आरक्षणाचा प्रश्न सोडवा नाहीतर….! मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे वळतील 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ भाजप आणि महाविकास आघाडीने त्यांच्या राजकारणापायी मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे .महाविकास आघाडीने तात्काळ अध्यादेश काढावा व मराठा समाजातील तरुणांचा भविष्याचा प्रश्न सोडवावा नाहीतर हे तरुण नक्षलवादावाडे वळतील, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी दिला. या पत्रकार परिषदेला संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, विराज तावरे व ब्रिगेडचे इतर पदाधिकारी उपस्थित होते .

मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी पुण्यात याबाबत पत्रकार परिषद घेऊन यावर मते मांडली. आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक अधिकार आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. न्यायमूर्ती गायकवाड यांच्या मागास आयोगाने घरोघरी जाऊन सर्वे करून समाजाच मागासलेपण सिद्ध करून तसा अहवाल राज्यशासनाला सादर केला.

त्यावर राज्यशासनाने शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवत असताना त्याला अंतरीम स्थगिती देण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला.

यापूर्वी तामिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये आरक्षण किंवा अलीकडच्या आर्थिकदृष्ट्या आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे वर्ग करताना त्याला स्थगिती देण्यात आली नव्हती, मग मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत वेगळा निर्णय कशासाठी घेतला असावा हा प्रश्न समोर आला आहे. दिलेली स्थगिती ही अत्यंत दुर्दैवी असून यात केंद्रातील भाजपा आणि राज्यातील महाविकास आघाडी यांच्यातील राजकारणाचा हा बळी असल्याचा संशय आम्हाला येतो आहे. या दुर्दैवी निर्णयामुळे मराठा समाजाच्या मुलामुलींचा शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये नुकसान होणार आहे. समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्या आहेत आणि समाजात उद्रेक होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि नोकरीतील नुकसान टाळण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि नव्याने मराठा आरक्षणाचा अध्यादेश कसा काढता येईल याचा तातडीने विचार करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.

मराठा समाजाच्या तरुणांनाही त्यांनी आवाहन केले असून आपण हिंसा किंवा आत्महत्येचा पर्याय निवडू नये.

कायदेशीर मार्गाने आपण ही लढाई लढून जिंकणार आहोत आणि आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ हुतात्म्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला दिले….⭕

anews Banner

Leave A Comment