Home नांदेड मुखेड शहरात चोरट्याने घातली धुमाकूळ ! चोरट्याने तीन ठिकाणी दुकाने फोडली !

मुखेड शहरात चोरट्याने घातली धुमाकूळ ! चोरट्याने तीन ठिकाणी दुकाने फोडली !

75
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220526-WA0019.jpg

मुखेड शहरात चोरट्याने घातली धुमाकूळ !

चोरट्याने तीन ठिकाणी दुकाने फोडली !

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड शहरातील लातुर महागार्गावरील राज्य देबडवार पेट्रोल पंपाच्या शेजारील चार ठिकाणी दोन चोरट्यांनी महसूल हातचलाखी दाखवत तीन दुकाने फोडवली व एका कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास केली . बाहाळी नाका परिसरातील एक दुकान फोडले . चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केल्या आहेत . या घटनेमुळे शहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची मागणी होत आहे . मुखेड चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे . २३ मे रोजी मध्यरात्री १२ ते २ वाजता दरम्यान दोन चोरट्यांनी गुलाम शेख यांचे महाराष्ट्र होम अप्लायंसेस , संदिप बादेवाड यांचे राजभुवन होम अप्लायंस दुकानाचे शटरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला . पण तो असफल झाला . शेजारील राहूल लोहबंदे यांचे प्रणिता हार्डवेअर दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील गल्ल्यामधील नगदी १२ हजार रुपये चोरले असल्याची माहिती मिळाली आहे . ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे . नगर परिषदेच्या पाठीमागील सय्यद फेरोज यांच्या घरात राहणारे महसूल कर्मचाऱ्याची दुचाकी वाहन क्र .एम . एच . २६ ए . एच . ८० ९ ६ लंपास केली आहे .
बाऱ्हाळी नाका परिसरातील चौधरी यांचे हार्डवेअर फोडून गल्यातील नगदी पैसे चोरले . सदरील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे . पोलिस निरीक्षक विलास गोबाडे , पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून चोराचा शोध पोलीस घेत आहेत.

Previous articleटिसीओसी च्या कालावधिच्या प्राश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगीरी।
Next articleमुखेड तालुक्यातील गडगयाळवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विहिरीचे खोदकामास प्रारंभ.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here