Home Breaking News शहीद सचिन जाधव यांच्यावर* *शोकाकुल वातावरणात अंतिम* *संस्कार*

शहीद सचिन जाधव यांच्यावर* *शोकाकुल वातावरणात अंतिम* *संस्कार*

119
0

*शहीद सचिन जाधव यांच्यावर* *शोकाकुल वातावरणात अंतिम* *संस्कार*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी अंत्य दर्शन घेऊन वाहिली आदरांजली , पुष्पचक्र अर्पण.
सातारा जिल्ह्यातील दुसाळे ता . पाटण येथील शहीद नायक सचिन संभाजी जाधव यांच्यावर शासकीय इतमामत आज अंतीम संस्कार करण्यात आले यावेळी त्यांना मानवंदना दिली . शासनाच्या वतिने राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील , गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्प चक्र अर्पण करून आदरांजली वाहिली . यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील , पाटणचे तहसीलदार समीर यादव यांनीही आदरांजली वाहिली . सातारा जिल्ह्यातील 111 इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव यांना दि . 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना
वीरमरण प्राप्त झाले होते . दुसाळे गावातून सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्य यात्रा काढण्यात आली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ते नियम पाळून ग्रामस्थांनी आपल्या शूर भूमिपुत्राचे अतिशय शोकाकुल वातावरणात शेवटचे दर्शन घेतले .

Previous article*कोरेगांवमधे १०० खाटांच्या कोविड* *सेंटरचे गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण*
Next article*वडगांव कोविड सेंटरला व्यापारी असोसिएनचा मदतीचा हात*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here