• Home
  • *वडगांव कोविड सेंटरला व्यापारी असोसिएनचा मदतीचा हात*

*वडगांव कोविड सेंटरला व्यापारी असोसिएनचा मदतीचा हात*

*वडगांव कोविड सेंटरला व्यापारी असोसिएनचा मदतीचा हात*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात नव्याने लोकसहभागातुन सुरू झालेले वडगांव कोविड सेंटरला वडगांव शहरातील व जिल्ह्यातुन आणि लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरूच आहे. तसेच शहरातील दानशुर व्यक्तीही कोविड सेंटरला मदतीसाठी पुढे येत आहेत.
तसेच आज पर्यंत वडगांव व्यापारी असोसिएन च्या वतिने अत्यंत उपयोगी अश्या वस्तूंची भरघोस मदत करण्यासाठी नेहमीच पुढे येत आहेत.
तसेच काल वडगांव व्यापारी असोसिएशन यांचेकडुन अत्यंत उपयोगी , तातडीची व महत्वाची गरज म्हणून पेठ वडगांव कोविड सेंटरला
वॉर्डऑक्सीजन सिलेंडर व पुर्ण कीट चे दोन सेट मदत स्वरूपात देण्यात आले.
यावेळी वडगांव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे) , मा. नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. तसेच यावेळी माजी.नगराध्यक्ष अभिजीत पोळ , व सर्व जेष्ठ , आदरणीय व्यापारी बंधू , व्यापारी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment