Home गडचिरोली गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ना. देवेंद्रजी फडणवीस व ना. सुधीरभाऊना साकडे

गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ना. देवेंद्रजी फडणवीस व ना. सुधीरभाऊना साकडे

95

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0041.jpg

गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ना. देवेंद्रजी फडणवीस व ना. सुधीरभाऊना साकडे

मुंबई येथे भेट घेऊन मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची केली विनंती

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरी चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व माजी वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मुंबई येथे भेट घेऊन गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेज च्या मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली व त्याबाबतचे निवेदनपर पत्र ही दिले

या भेटीदरम्यान त्यांनी राज्य सरकार गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेजच्या ऐवजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत अवगत केले
गडचिरोली जिलह्यात आरोग्यविषयक सोयी सुविधा नसल्याने रुग्‍णांना नागपूर व चंद्रपूरला नियमितपणे जावून औषधोपचार करावा लागत आहे. गडचिरोली सारख्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची उभारणी झाल्यास येथील रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये सोईसुविधा उपलब्ध होईल. येथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात उत्तम संधी देखील मिळेल .त्यामुळे जिल्ह्याची मागास असणारी ओळख पुसण्यासाठी मोठी संधी आहे. करिता याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडावे व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी प्रयत्न करावे अशी आग्रहाची विनंती त्यांनी यावेळी केली

Previous articleजिल्ह्यातील पीक कर्ज वाटप मोहिमेला अभूतपूर्व यश
Next articleएसआरपीएफ जवानाने सहकाऱ्यावर गोळ्या घालुन केली हत्या।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.