Home गडचिरोली एसआरपीएफ जवानाने सहकाऱ्यावर गोळ्या घालुन केली हत्या।

एसआरपीएफ जवानाने सहकाऱ्यावर गोळ्या घालुन केली हत्या।

115

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0039.jpg

एसआरपीएफ जवानाने सहकाऱ्यावर गोळ्या घालुन केली हत्या।

त्यानंतर स्व:ताही केली आत्महत्या

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलिस स्टेशन अतंर्गत एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केली आणि स्व:तावर गोळ्या घालुन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली असुन सदर घटनेने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि,मरपल्ली पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले राज्य राखीव दल यातील एक जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केली आणि लगेच स्व:तावर गोळ्या झाडून आत्महत्या केली.वृत्त लिहिस्तोवर हत्येचे कारण कळू शकले नाही.सदर घटनेचा पुढिल तपास जिमलगट्टा येथिल उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.