• Home
  • भोगमवाडी गावात दोन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

भोगमवाडी गावात दोन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0102.jpg

भोगमवाडी गावात दोन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

कोल्हापूर:करवीर तालुक्यातील भोगमवाडी येथील दोन चिमुरड्यांचा शेत तळ्यात बुडून मृत्यु . आदर्श बाजीराव भोगम वय ७ , आणि अमित अशोक भोगम वय १० वर्ष आहे . सदर घटना रविवारी रात्री नातेवाईकांना समजली. अमित इयत्ता चौथीत , तर आदर्श इयत्ता पहिलीला होता.
खेळता, खेळता दुपारी घरातून बाहेर पडलेले दोघे भाऊ घरी परतलेच नाहीत.
त्यानंतर नातेवाईकांनी शोध घेतला असता शेततळ्याच्या काठावर त्या दोघांची चपलं व कपडे आढळून आले. शेततळ्यामध्ये शोध घेतल्यावर त्या दोघांचे मृतदेह सापडले.
अमित भोगम याच्या मागे भाऊ व आई-वडील आहेत. आणि आदर्शच्या भोगमच्या मागे दोन बहिणी व आई-वडील असा परिवार आहे. दोन्ही मुलांच्या आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने भोगमवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे संपूर्ण गावावर शोककळा पसरली ह्या घटणेची नोंद राधानगरी पोलिसांत केली आहे. (युवा मराठा न्युज नेटवर्क)

anews Banner

Leave A Comment