Home Breaking News सलमानमुळे बरबाद झाले करिअर!….गोविंदा ✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ...

सलमानमुळे बरबाद झाले करिअर!….गोविंदा ✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

416
0

🛑 सलमानमुळे बरबाद झाले करिअर!….गोविंदा 🛑
✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕बॉलीवुडचा हिरो नंबर वन अभिनेता अशी गोविंदाची ओळख. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्या अभिनेत्यावर रसिक आजही जीवापाड प्रेम करतात अशा मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या अभिनयासह स्टाईल, डान्स, कॉमेडी आणि रोमान्सने गोविंदाने रुपेरी पडद्यावर धम्माल उडवली. 80 आणि 90च्या दशकात तर गोविंदाचाच बोलबाला होता. त्यामुळंच की काय त्याला हिंदी चित्रपटसृष्टीचा नंबर वन अशी उपाधी रसिकांनी देऊन टाकली. त्याच्या या अभिनयाच्या जोरावर त्याला विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.
बॉलिवूडमध्ये नेपोटिझम वाद सुरू झाला आहे. ज्यात अनेकांनी सलमान खान, यशराज बॅनर आणि करण जोहर यांना ट्रोल करायला सुरुवात केली. अशात आता अभिनेता गोविंदाचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. पत्रकार परिषदेत त्याने बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या घराणेशाहीवर परखड मत मांडले होते. जिथे सलमान शाहरूख यांचे सिनेमे हिट ठरतात. तिथे गोविंदाला एकही सिनेमा मिळू नये ही हैराण करणारी गोष्ट असल्याचे त्याने म्हटले होते. गेल्या १० वर्षापासून गोविंदाला एकही सिनेमाची ऑफर मिळाली नाही. यावर त्याने सांगितले की, देवाची कृपा आहे की, माझा घरखर्च हा सिनेमावर अवलंबून नाही. असे राहिले असते तर माझी काय अवस्था झाली असती याचा विचारही करवत नाही.
गोविंदाने एका मुलाखतीत सांगितले होते की- ‘मी सलमानबरोबर ‘पार्टनर’ सिनेमामध्ये काम केले होते, त्यानंतर बर्‍याच लोकांनी त्याला सांगितले की तु गोविंदा बरोबर काम करू नको, तुला मोठा प्रोब्लेम होईल.’ इंडस्ट्रीमध्ये एक जेलस फॅक्टर आहे. जितके माझे कौतुक केले गेले तेवढे मी इंडस्ट्रीतून दूर फेकला जाणार आणि माझ्याबरोबरही तेच घडले बॉलिवूडपासून कधी दूर झालो हे माझेच मला कळाले नाही असे गांविदाने सांगितले…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here