Home Breaking News लाँकडाऊनमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील अपघातात पाचपटीने घट ✍️ पुणे ( विलास...

लाँकडाऊनमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील अपघातात पाचपटीने घट ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

116
0

🛑लाँकडाऊनमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील अपघातात पाचपटीने घट 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ लॉकडाऊनमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गवरील वाहतूक तिपटीने कमी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाणही पाचपटींनी घटले आहे. गेले तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर एकही गाडी धावली नाही. त्यामुळे महामार्गावरील होणाऱ्या अपघातामध्येही घट झाली आहे. लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती.

महामार्गावरील अपघात घटले असले तरी आता मोकळ्या रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढू नये. त्यामुळे यावर आता महामार्ग पोलीस लक्ष ठेवणार आहेत.
जेणे करुन अपघात होणार नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून एरवी दररोज सुमारे 30 हजार वाहनांची ये-जा सुरु होती. सध्या लॉकडाऊनमध्ये ही वाहतूक सुमारे 8-10 हजार वाहनांवर आली आहे. त्यामुळे अपघात होण्याचेही प्रमाण घटले आहे. मात्र, रस्ते मोकळे असल्यामुळे वाहतुकीचा वेग वाढू नये, यासाठी भरधाव वाहनांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी चार पथके तैनात केली आहेत.

लॉकडाऊनमुळे पुणे शहरातील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण घटलं आहे. गेल्या तीन वर्षातील मार्च आणि एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा अपघातात घट झाली आहे.

पुणे शहरात मागील तीन वर्षातील मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या तुलनेत यंदा अपघात आणि मृत्यूचे प्रमाण घटलं आहे. पुण्यात मार्च महिन्यात 30 अपघात झाले आहेत. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 43 जण जखमी झाले आहेत. मात्र त्या तुलनेत एप्रिल महिन्यात केवळ 3 अपघात झाले आहेत. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी एक्सप्रेस वे वर किंवा मोठ्या द्रुतगती मार्गांवर अपघात होत असतात. रस्ते अपघात मृत्यू किंवा जखमींची संख्या अधिक असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अपघात आणि मृत्यूचे प्रमाणही घटले आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here