Home नाशिक नांदगाव महाविद्यालयात सर्प-समज गैरसमजयावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्पमित्र तसेच एन.एस.एस.यांच्या संयुक्त...

नांदगाव महाविद्यालयात सर्प-समज गैरसमजयावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्पमित्र तसेच एन.एस.एस.यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान संपन्न

103
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0053.jpg

नांदगाव महाविद्यालयात सर्प-समज गैरसमजयावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्पमित्र तसेच एन.एस.एस.यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान संपन्न

नांदगाव ( प्रतिनिधी अनिल धामणे)साधा साप दिसला की तो मारायचा हे सर्व सामान्य लोकांच्या मनावर बिंबले गेले आहे साप म्हणजे शत्रू हीच शिकवण पिढ्यानपिढ्या मिळत केली साप ही समाज मानवी अप्रचाराने बदनाम झाला आहे विषारी आणि बिनविषारी साप कोणता हे ओळखताना आल्याने माणूस घाबरतो त्याच्या या अज्ञानामुळे सापाला मारले जाते सापाच्या जाती न ओळखता आल्यामुळे अनेक सापांचा जीव जातो तेव्हा हे थांबविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन व सर्पमित्र तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नांदगाव महाविद्यालयात सर्पाची ओळख आणि समज गैरसमज डिजिटल चित्रफिती द्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा उपक्रम घेण्यात आला.
सर्पतज्ञ सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे कासार साहेब ,वन विभाग,आर.एफ.ओ नांदगाव, उपप्राचार्य एस.ए.मराठे, सुनील महाले वन परिमंडळ, डॉ.सौ.ख्याती तुसे, प्रभाकर निकुंभ, वन्यजीव संरक्षण, बहुउद्देशीय संस्था, नांदगाव, सुरेश नारायणे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्पमित्र अमोल सोनवणे,प्रमोद महानुभाव,मंगेश चारोस्कर, मंगेश आहेर, पंकज शर्मा, संदिप जाधव, महेश आहेर,पवन झाडगे,वैभव गायकवाड,सागर विसपुते,मयुर बागुल एन.एस.एस.प्रमुख प्रा.बालाजी मोरे, डॉ.अतुल मदने आदी उपस्थित होते.
साप हा शेतकऱ्यांचा जसा मित्र आहे तसा तो मानवाचा देखिल मित्र आहे.कारण अनेक औषधात सर्पाचे विष वापरले जाते.अंगदुखी, कॅन्सर,भूल आदी इंजेक्शन मध्ये वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
धामण,गवत्या,तस्कर,अजगर,मांडुळ,दिवड, पट्टेरी,पानसर्प,कुकरी हे साप बिनविषारी आहेत तर मण्यार घैणस,फुरसे,नाग हे अतिविषारी साप आहे.हे सर्व साप कसे ओळखाल या बाबतची माहिती रणशूर यांनी विद्यार्थ्यांना दिली शिवाय साप चावल्यास अंगारे-धुपारे किंवा तांत्रिक- मांत्रिक यांच्याकडे न जाता जवळच्या सरकारी रुग्णालयात त्या रुग्णाला दाखल करण्याची त्यांनी सूचना दिली. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होते असे रणशुर म्हणाले. तसेच प्राथमिक स्वरुपात कोणती काळजी घ्यावी ही माहिती दिली प्रात्यक्षिके द्वारे विद्यार्थ्यांना दिली. यावेळी डॉ.सौ.ख्याती तुसे व प्रा. सुरेश नारायणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बालाजी मोरे व डॉ.अतुल मदने यांनी केले. सूत्रसंचालन के.टी.बागुल यांनी केले तर आभार प्रा.एस.पी. दौंड व प्रा. पी. एम. अहिरे यांनी मानले कार्यक्रम सिनियर व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांना स्वतंत्र वेळेत दोन सत्रात घेण्यात आला. व सापा विषयी विद्यार्थ्यांचे समज व गैरसमज दूर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here