Home बुलढाणा शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे भवितव्य धोक्यात संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शिक्षण अधिकारीं...

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे भवितव्य धोक्यात संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शिक्षण अधिकारीं बुलढाणा यांना दिले निवेदन

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0046.jpg

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे भवितव्य धोक्यात

संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शिक्षण अधिकारीं बुलढाणा यांना दिले निवेदन

युवा मराठा वेब न्यूज पोर्टल
प्रतिनिधी रविंद्र शिरस्कार संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची अनेक ठिकाणी पदे रिक्त आहेत त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे त्याकरीता संग्रामपूर तालुक्यातील काही पत्रकार तसेच टुनकी येथील सुजाण नागरिक यांनी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये संग्रामपूर तालुक्यातील तसेच टुनकी येथील शाळेमध्ये आठ खोल्यांची कमतरता आहे सदर शाळेमध्ये दोन सत्रा मध्ये शाळा भरवली जात आहे विद्यार्थ्यांचे भवितव्य पाहता त्वरित नवीन इमारती बांधण्यात यावी तसेच टुनकी गावासह संग्रामपूर तालुक्यातील अशा बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असून शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यात यावे तसेच काही शाळांमध्ये दोन टप्प्यांमध्ये शाळा घ्यावी लागत आहे संग्रामपूर तालुक्यातील मराठी प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे संख्या भरपूर असल्यामुळे शिक्षकांचे पदे रिक्त तसेच बऱ्याचशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्रास सहन करावा लागत आहे याकरता तालुक्यातील पत्रकार तसेच नागरिक यांनी जिल्हाधिकारी तसेच शिक्षण अधिकारी बुलढाणा यांना निवेदन देऊन संग्रामपूर तालुक्यातील शिक्षकांची पदे भरण्या यावी याकरिता निवेदन दिले आहे निवेदनावर प्रभू पारस्कार, भास्कर बोंद्रे, विवेक राऊत, कदिर शेख, विजय इंगळे, विशाल जयस्वाल, गोपाल कुलकर्णी, श्रीधर चोरे, सुरेश हेरोडे, संदीप पिंपळकर, गोपाल उमाळे, विठ्ठल कल्याणकर, विक्रम मांडोकार, गजानन मांडोकार, यासह इतर नागरिकांच्या सह्या आहेत..

*टुनकी गावासह तालुक्यातील बहुतांश गावांमधील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत तसेच बऱ्याच ठिकाणी शाळा खोल्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांमध्ये शाळा भरवावी लागत आहे त्यामुळे आम्ही शिक्षणाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले आहे*
भास्कर बोंद्रे
बावनबिर
सामाजिक कार्यकर्ते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here