Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे फोटोग्राफी दिन साजरा

रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे फोटोग्राफी दिन साजरा

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0036.jpg

रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे फोटोग्राफी दिन साजरा                             रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे आज जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला. यानिमित्त एमआयडीसी विश्रामगृहामध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्ष तथा ज्येष्ठ फोटोग्राफर अजय बाष्टे आणि पदाधिकारी, सदस्यांनी कॅमेऱ्याचे पूजन केले. त्यानंतर दिवंगत फोटोग्राफर्सना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

संस्थेतर्फे काही महिन्यांत फोटोग्राफर्ससाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. फोटोग्राफर्सच्या हितासाठी मार्गदर्शन, सेमिनार, कार्यशाळा, प्रदर्शन आदींचे आयोजन करण्याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. तसेच दहीहंडीनिमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेसंदर्भात चर्चा करण्यात आली. आपली संस्था शासनमान्य असून जिल्ह्यातील छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर्सनी संस्थेत सहभागी व्हावे, असे आवाहन अजय बाष्टे यांनी या वेळी केले. आजच्या कार्यक्रमात दहा नवीन फोटोग्राफर्सनी संस्थेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यांचे स्वागत या वेळी करण्यात आले.

पुढील वर्षभर होणाऱ्या विविध उत्सव, सणांमधील फोटोग्राफी स्पर्धासुद्धा घेण्यात येणार आहे. एकूणच रत्नागिरी जिल्ह्यात सण, उत्सवांचे छायाचित्रणाच्या माध्यमातून अनोखे मार्केटिंग केले जाणार आहे, यासंदर्भातही नियोजन या वेळी अध्यक्ष अजय बाष्टे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या वेळी सुबोध भुवड, संजय देवरुखकर, साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले, हर्षल कुलकर्णी, भूषण केळकर, समीर जुवेकर, प्रसाद जोशी अमित आंबवकर, अनुपम तिवारी, प्रदीप हरचिरकर, नीलेश कोळंबेकर, अमर शेठ, राकेश बोरकर, अनिकेत जाधव, ओम पाडाळकर, अमिता साळवी, प्रशांत निंबरे, शिरीष तारवे यांच्यासह अनेक फोटोग्राफर्स उपस्थित होते.

दहीहंडी फोटोग्राफी स्पर्धेला प्रतिसाद
संस्थेतर्फे आयोजित दहीहंडी फोटोग्राफी स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याकरिता आज २० ऑगस्टला रात्री १० वाजेपर्यंत फोटो rdpvphotographers@gmail.com या इमेल आयडीवर पाठवायचा आहे. स्पर्धेसाठी फोटो ८ बाय १२ इंचाचा व ३०० रिझोल्यूशनमध्ये असावा. मोबाईलमधून काढलेल्या फोटोंच्या गटासाठी अनुक्रमे १५००, १००० आणि ७५० अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच व्यावसायिक गटासाठी अनुक्रमे ३०००, २००० आणि १००० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Previous articleम.न.से.कडून देवळे शाळेला भेटवस्तू वाटप
Next articleनांदगाव महाविद्यालयात सर्प-समज गैरसमजयावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्पमित्र तसेच एन.एस.एस.यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here