• Home
  • मुखेड तालुक्यात कोरोना covid-19 लसीकरण मोहिमेस वेग…

मुखेड तालुक्यात कोरोना covid-19 लसीकरण मोहिमेस वेग…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210404-WA0047.jpg

मुखेड तालुक्यात कोरोना covid-19 लसीकरण मोहिमेस वेग…

देगलूर तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार.
मुखेड तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेस वेग घेतला आहे कारण गाव तिथे लसीकरण हा उपक्रम मुखेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी अतिशय निडर पणाने राबवत असतानाच अचानक लादगा ह्या गावी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी भेट देवून लसीकरणाची चौकशी केली योग्य पद्धतीने लसीकरण होत होते ते पाहुन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केली यावेळी उपस्थित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गरुडकर, समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी सौराते, विस्ताराधिकारी सचिन पांढरमिसे, तालुका परिवेक्षक राजकुमार ढवळे, आरोग्य सेविका गायत्री जाधव (पवार), आरोग्य सेवक मनोहर सावंत, क्लार्क गजानन वन्नाळे, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच बालाजी इबितदार, आशा स्वयंसेविका व गावातील नागरिक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment