• Home
  • पनवेल महानगर पालिका ढिसाळ कारभार उघड

पनवेल महानगर पालिका ढिसाळ कारभार उघड

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210326-WA0012.jpg

प्रतिनिधी-अरुण कुंभार ( रायगड जिल्हा ब्युरो चीफ)

पनवेल महानगर पालिका ढिसाळ कारभार उघड

पनवेल महानगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय ढिसाळ कारभार सुरू आहे देशात तसेच राज्यात सुरू असलेल्या कोरून संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगर पालिका आयुक्तांच्या दुर्लक्ष पणामुळे सुमारे 5836 कोरोना बाधित रुग्णांचा पत्ताच महानगर पालिकेला लागला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महानगर पालिकेच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे
या घटनेमुळे पनवेल महानगर पालिका परिसरात हे रुग्ण बिनबोभाट वावरत असावेत पर्यायी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्या ऐवजी वाढत आहे

 

पनवेल महानगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कारकिर्दीत कोरोना रुग्ण आटोक्यात येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही आत्मकेंद्रित असलेले देशमुख उपदेशाचे डोस पाजन्य व्यतिरिक्त ठोस अशी उपाययोजना करत नसल्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णाची माहितीच महानगर पालिकेकडे उपलब्ध नसल्याची बाब उजेडात अली आहे
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील कोविड माहिती समन्वयक पुरुषोत्तम जैस्वाल यांनी पनवेल महानगर पालिका आयुक्तांकडे 5836 कोरून रुग्णांचे पुढे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे महानगर पालिकेच्या कोरोना रुग्ण पुनर्वसनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहे
कोरोना रुग्णांची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नसेल तर आयुक्त आणि त्यांची टीम कोणत्या टार्गेट साठी काम करत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे
जवळपास सहा हजार रुग्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातुन गायब आहेत ते कुठे आहेत कोणत्या रुग्णालयात उपचारासाठी आहेत की कोणत्या कंपनीत काम करत आहेत कुठे फिरत आहेत की पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोना सोबत जागून इतरांनाही बाधित करीत आहेत याचा महानगर पालिकेला कोणताही सुगावा लागला नसल्याने नागरिकांना कोविद बाधित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे
शहरात कोविड चाचणी करणारे केंद्र आणि खाजगी हॉस्पिटल यांच्यासोबत आयुक्तांचे आर्थिक लगेबांधे असल्याशिवाय त्यावर आयुक्तांचा अंकुश नाही असे बोलले जाते
कोरोनाची चाचणी केल्यानंतर रुग्णाची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ला देण्यात येते त्यांच्याकडून महापालिकेला माहिती प्राप्त होते त्यातून ही गडबड उघडकीस आली आहे

महापालिका प्रशासन ढिम्म असल्याने त्यांना आत्तापर्यंत जवळपास सहाहजार रुग्ण शोधून काढणे त्यांचा पत्ता शोधून काढणे यात अपयश आल्यामुळे इतर बऱ्याच नागरिकांमध्ये कोरोनाचे विषाणू पसरण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आंधळी कोशिंबिरी खेळण्यात मग्न राहुद्या आता सरकारच्या माझे आरोग्य मी जबाबदार संकेतानुसार आपली काळजी आपणच घ्यावी लागणार आहे

anews Banner

Leave A Comment