• Home
  • नांदेड जिल्ह्यातील राजबिंड व्यक्तिमत्त्व श्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर काळाच्या पडद्याआड…

नांदेड जिल्ह्यातील राजबिंड व्यक्तिमत्त्व श्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर काळाच्या पडद्याआड…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210403-WA0097.jpg

नांदेड जिल्ह्यातील राजबिंड व्यक्तिमत्त्व श्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर काळाच्या पडद्याआड…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातील एक राजबिंड व्यक्तिमत्व तरुणाला लाजवेल असा चेहऱ्यावर तेज उत्साह असणारे नेते आदरणीय श्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर हे दिनांक ३ एप्रिल रोजी
काळाच्या पडद्याआड गेले. कुंटूर गावातून सरपंचपदापासून ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, गुंटुर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार बँकेचे संचालक आणि बिलोली विधानसभेचे आमदार, नांदेड लोकसभेचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इत्यादी सह अनेक असे महत्त्वाचे पद भूषविले नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर साहेब त्यांचे निधन झाले. नांदेड जिल्ह्यातील राजकीय पोकळी न भरून निघणारी आहे. कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारा नेता हरपला असं म्हणावं लागेल. या दुःखातून देशमुख कुंटूरकर परिवार व सर्व हितचिंतकांना कार्यकर्त्यांना सावरण्याची शक्ती ईश्वर देवो. व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

anews Banner

Leave A Comment