Home पश्चिम महाराष्ट्र अवताडे निवडणूक रिंगणात कायम

अवताडे निवडणूक रिंगणात कायम

132
0

राजेंद्र पाटील राऊत

अवताडे निवडणूक रिंगणात कायम
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोनिवडणुकीचे बिगुल वाजले

पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकिसाठी आज 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर सिद्धेश्वर अवताडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने भाजपला धक्का बसला आहे. तर माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माऊली हळनवर यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

पंढरपूर पोटनिवडणूकिसाठी 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत 8 अर्ज अवैध ठरले होते. वैध 30 अर्जापैकी 11जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. तर 19 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिद्धेश्वर अवताडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. तर अपक्ष शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचे अर्ज राष्ट्रवादी चे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत.

एकूणच उमेदवार अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून राष्ट्रवादी चे भगीरथ भालके, भाजपचे समाधान अवताडे, अपक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. तर स्वाभिमानीचे सचिन पाटील, अपक्ष शैला गोडसे यांना किती मते पडतात यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

Previous articleअप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांची धडक कारवाई
Next articleनांदेड जिल्ह्यातील राजबिंड व्यक्तिमत्त्व श्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर काळाच्या पडद्याआड…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here