• Home
  • *वडगांव शहरामध्ये सोमवार पासून दहा दिवस कडकडीत लाँकडाऊन*

*वडगांव शहरामध्ये सोमवार पासून दहा दिवस कडकडीत लाँकडाऊन*

*वडगांव शहरामध्ये सोमवार पासून दहा दिवस कडकडीत लाँकडाऊन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात वडगांव शहरामधिल कोरोना रूग्णांचा आकडा दोनशे पार झाला असुन दिवसेंदिवस कोरोना चे रूग्ण वाढत चालले असुन वडगांव शहरातील कोरोना महामारीस प्रतिबंध करणेसाठी , कोरोना ची साखळी तोडण्यासाठी दहा दिवस कडकडीत बंद ठेवण्यासाठी आज दिनांक ०५/०९/२०२० रोजी वडगांव पालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पेठ वडगांव शहर सोमवार दिनांक ०७/०९/२०२० ते बुधवार दिनांक १६/०९/२०२० अखेर दहा दिवस जनता कर्फ्यु पुकारला आहे.
या काळात फक्त दूध, मेडिकल स्टोअर्स,अत्यावश्यक सेवा चालु राहतील , विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करण्यात येईल . वडगांव शहर कडकडीत बंद पाळून कोरोना हद्दपार करूया तरी सर्व नागरिकांनी , व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासन यांनी केले आहे.
पेठ वडगांवच्या जणतेच्या काळजीपोठी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात सर्वांनी काळजी घ्या आपल्या वडगांव शहराला कोरोना पासुन रोखायला हवं कुठं तरी हे थांबायला हवं अस नेहमीच त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत असे नागरीकांच्या हितासाठी वडगांव शहर काही दिवसांकरीता लाँकडाँऊन करणेची वेळोवेळी मागणी केली वडगांवच्या नेत्या *कल्याणी सखी मंचच्या अध्यक्षा माजी.नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका* *सौ.विद्याताई* *पोळ* यांच्या मागणीला खऱ्या अर्थाने यश आले.
सत्ता असो वा नसो पण मनात नेहमीच वडगांवच्या जनतेची काळजी करणाऱ्या आदरणीय सौ. विद्याताई पोळ .

anews Banner

Leave A Comment