• Home
  • *कागल तालुक्यामध्ये रविवार पासून दहा दिवस जनता कर्फ्यु*

*कागल तालुक्यामध्ये रविवार पासून दहा दिवस जनता कर्फ्यु*

*कागल तालुक्यामध्ये रविवार पासून दहा दिवस जनता कर्फ्यु*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात कोरोना महामारीस प्रतिबंध करणेसाठी दहा दिवस कडकडीत बंद ठेवण्यासाठी सन्माननीय ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री हसनसो मुश्रीफ साहेब यांनी आज दिनांक ०४/०९/२०२० आज रोजी कागल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग घेतली त्यामध्ये कागल तालुक्यामध्ये रविवार दिनांक ०६/०९/२०२० ते मंगळवार दिनांक १५/०९/२०२०अखेर दहा दिवस जनता कर्फ्यु पुकारला आहे. या काळात फक्त दूध, मेडिकल स्टोअर्स, शेती सेवा केंद्र, सरकारी निमसरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना ओळखपत्र दाखवून जाता येईल, बँका बंद राहतील,ATM सुरू राहील, विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना मंत्री महोदयांनी दिली आहे कडकडीत बंद पाळून कोरोना हद्दपार करूया तरी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मा.नामदार मुश्रीफ यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment