Home नांदेड देगलूर येथील त्या प्रभागातील प्रश्न तत्काळ न सोडविल्यास मतदानावर बहिष्कार टाकत तीव्र...

देगलूर येथील त्या प्रभागातील प्रश्न तत्काळ न सोडविल्यास मतदानावर बहिष्कार टाकत तीव्र जनांदोलन छेडू ; अशोक कांबळे देगलूरकर

251

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर येथील त्या प्रभागातील प्रश्न तत्काळ न सोडविल्यास मतदानावर बहिष्कार टाकत तीव्र जनांदोलन छेडू ; अशोक कांबळे देगलूरकर

नांदेड, दि. १६ – राजेश एन भांगे /युवा मराठा न्युज नेटवर्क

देगलूर येथील प्रभाग क्र. ११ मधील शिवनेरी नगरात जवळपास ३० वर्षापासून रास्ता तर आहे पण
रस्त्यात खड्डा की खड्यात रास्ता हेच कळायला मार्ग नाही नागरिक चालु शकतील असा एखादा पक्का रस्ता नाही, आणि दोन दोन जलकुंभ उशाला अन् कोरड घश्याला अशी अवस्था असून.
येथील मोकळ्या प्लॉटस् मधील साचलेल्या पाण्यामुळे चिखल होऊन हिंन्स प्राण्याचे (साप, विंचू, खेकडे, इंगळी ) इत्यादी घातक जीव जंतू घरात घुसून जीवित हानी होण्याची भीती नागरिकांना निर्माण झाली आहे व तसेच विद्युत खांब च्या अभावांमुळे रात्रीची दिवा बत्तीची देखील सोय नाही.
तर आरक्षित मोकळी जागा ही चोरीला गेल्याने येथील अबाल वृद्धांना बसण्यास, खेळण्यास, मोकळा श्वास घेण्यास सुद्धा जागा उरली नसून.
येथील जनसामान्य अबाल वृद्ध नागरिकांना अशा अनेक
नागरी असुविधांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तरी नागरिकांना होत असलेल्या नागरी असुविधां बद्दल गांभीर्याने घेत तत्काळ दोन महिन्यांच्या आत सदरील या मागण्या ( प्रश्न ) मार्गी लवण्यात याव्यात
अन्यथा येणाऱ्या पालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकत प्रभागातील लोकां समवेत तीव्र जानांदोलन छेडण्यात येईल असा इशारा देगलुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री ईरलोड व तहसीलदार श्री गुंडमवार यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा देगलूर शहराध्यक्ष अशोक कांबळे देगलूकर यांनी निवेदना द्वारे दिले आहे.

Previous articleमुखेड येथे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या कार्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
Next articleपाळे बु सरपंचपदी नंदू भाऊ गोविंद निकम बिनविरोध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.