• Home
  • अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांची धडक कारवाई

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांची धडक कारवाई

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210403-WA0050.jpg

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांची धडक कारवाई
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कोरोनाचा घेतला अढवा.तसेच दुकानदार,भाजी विक्रेते,सामान्य नागरिकांना केल्या काही सूचना,

कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रसार अतिशय झपाट्याने वाढत असल्याने आज सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अभिजीत धाराशिवकर व बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोषगिरी गोसावी व पोलीस पथक यांना सोबत घेऊन संपूर्ण बार्शी शहरांमध्ये करोना च्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. – दरम्यान कोविड च्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीची उल्लंघन केल्याच्या कारणावरून पांडे चौकातील एस एस मोबाईल्स हे दुकान तीस दिवसांसाठी सील केले. या छोट्याशा मोबाईल दुकानांमध्ये विक्रेते व ग्राहक असे मिळून एकूण वीस जण उपस्थित होते सामाजिक अंतर देखील ठेवले नव्हते, तसेच ग्राहकांपैकी बऱ्याच जणांनी मास्कचा वापर केलेला नव्हता तसेच दुकानांमध्ये सॅनिटायझर देखील उपलब्ध ठेवलेले नव्हते. या कारणास्तव दुकान 30 दिवसांसाठी सील करण्यात आले.

anews Banner

Leave A Comment