• Home
  • देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथे घरास अचानक आग लागून दोन घरे भस्मसात. जनावरे भाजली…

देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथे घरास अचानक आग लागून दोन घरे भस्मसात. जनावरे भाजली…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210404-WA0024.jpg

देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथे घरास अचानक आग लागून दोन घरे भस्मसात. जनावरे भाजली…

▪️ गावकऱ्यांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे कोकलगाव येथे दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून कोकलगाव येथील 1) दादाराव गणपत जिवबा, 2) सुरेश रामजी जिवबा यांच्या दोन घरास लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य व दोन बैल, दोन म्हशी, व एक वगार जळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितले व तसेच दादाराव जीवबा यांचे हरभरा, तुर, करडी, खत, शेती अवजारे इत्यादी जळून खाक झाली. सुरेश जीवबा यांचे 50 पाईप, दहा क्विंटल हरभरा, पाच क्विंटल तूर, शेतीची अवजारे व रोख रक्कम जळून खाक झाली.या आगीत दोन्ही शेतकऱ्याची मिळून अंदाजे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. संसारोपयोगी साहित्य, शेती अवजारे, जनावरे, शेतीमाल जळून खाक झाल्याने जिवबा कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. देगलूर येथील अग्निशामक दलाला माहिती दिल्यामुळे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत गावकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. अथक परिश्रम घेऊन ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. गावातील ग्रामस्थांनी पाणी आणून आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि ही आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला. सदरील घटनेची माहिती समजताच महसूल विभागाचे बिजलवाडी सज्जाचे तलाठी कुंभारे साहेब, पोलीस स्टेशन मरखेल येथील पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, बीट जमादार मोहन कणकवले, गजानन जोगपेटे, पांढरे, व पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा रीतसर पंचनामा केला. आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबास प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करून सहकार्य करावे अशी मागणी होत आहे

anews Banner

Leave A Comment