Home Breaking News फडणविसांनी आज कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन, मुंबई येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद...

फडणविसांनी आज कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन, मुंबई येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे –

129
0

फडणविसांनी आज कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन, मुंबई येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई ,दि,२८ – जीएसटी कम्पेन्सेशनचे 19,233 कोटी रूपये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला प्राप्त झाले आहेत. जे लोक वारंवार केंद्र सरकारवर आरोप करीत होते, त्यांनी आता केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजे.
– ‘पीएम केअर’मधून सुद्धा सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली आहे. मी त्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारचे आभार मानतो.
– मर्यादित लोकप्रतिनिधींमध्ये अधिवेशन घेण्यास आमचा विरोध आहे. कारण, अधिवेशनाला उपस्थित राहणं हा प्रत्येक सदस्याचा संवैधानिक अधिकार आहे. कोणत्याही सदस्याच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणता येणार नाही.
– अयोध्येत राममंदिर भूमिपूजन होणारच आणि ते भव्य प्रमाणात व्हावे, ही कोट्यवधी रामभक्तांची इच्छा आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे जे जेथे आहेत, तेथून सहभागी होतील आणि नियम पाळून आनंदही साजरा करतील.
– अयोध्येतील राममंदिराचे ई-भूमिपूजन करण्याची मागणी एमआयएमने केली आहे आणि आता तीच मागणी मुख्यमंत्री का करतात? असे हि यावेळी देवेंद्र फडणविस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here