राजेंद्र पाटील राऊत
पेठ वडगांवात घोड्यांच्या शर्यती करणाऱ्यारव गुन्हा दाखल
पेठ वडगांव : दि 4 ता. हातकणंगले येथील तासगाव माळावर घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन करून भारतीय प्राण्यांना निर्दयी पणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11 (1) (अ) प्रमाणे अनव्ये गुन्हा दाखल केला आहे .सविस्तर गुन्ह्याची माहिती अशी की शुक्रवार दि 2 रोजी दुपारी 4 वाजता वडगांव येथे काही लोकांनी घोड्यांच्या शर्यतीला बंदी असताना देखील शर्यती केल्या होत्या . सदर शर्यती आयोजकांवर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शखाली पो.काँ. दादा माने यांना माहिती मिळताच तात्काळ
शर्यती आयोजकावर प्राण्यांना निर्दयी पणे वागणूक प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11(1) (अ) अनव्ये नुसार गुन्हा दाखल केला यामध्ये आरोपी सचिन कराडे , दत्ता कांबळे , सुमित कांबळे , अरुण कुरणे रा. सर्व वडगांव ,स्वप्नील पाटील रा. मौजे.तासगाव, विशाल रा. सांगली राजू भैया रा. शिरोली, फंट्या रा. इचलकरंजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास दादा माने व पोलीस हे करत आहेत. (युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर )
