Home बुलढाणा गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जयश्रीताई शेळके यांच्याकडून...

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जयश्रीताई शेळके यांच्याकडून सत्कार

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0022.jpg

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जयश्रीताई शेळके यांच्याकडून सत्कार

मोताळा,(संजय पन्हाळकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या येथील दोन विद्यार्थ्यांचा काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी २२ जुलै रोजी सत्कार करीत गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

येथील प्रज्वल रवींद्र भोरे व प्रसन्न मुकुंद क्षीरसागर या विद्यार्थ्यांची शेगाव येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. त्यानिमित्त काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी शुक्रवारी राजर्षी शाहू पतसंस्थेत दोन्ही गुणवंतांसह त्यांच्या पालकांचा सत्कार केला. प्रज्वल आणि प्रसन्न दोघेही सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. जिद्द व परिश्रमाच्या जोरावर त्यांनी नवोदय परीक्षेत यश मिळवले. दोघांचे कौतुक करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेची तयारी करतांना दोघांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले. भास्कर हिवाळे यांची धामणगाव बढे उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही जयश्रीताई शेळके यांनी सत्कार केला.
यावेळी सरपंचपती अलीम कुरेशी, पत्रकार तथा ग्रा. पं. सदस्य रशीद पटेल, धनराज महाजन, सामाजिक कार्यकर्ते उल्हास पाटील, भागवत बढे, अशोक जाधव, माळी समाज बहुउद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष मुकुंद क्षीरसागर, माजी सरपंच रवींद्र भोरे, माजी उपसरपंच नारायण गोरे, राजू चौथनकर, प्रा. डॉ. गणेश हुडेकर, सतीश पाखरे, शिक्षक गजानन शेलेकर, नानाभाऊ बढे,योगेश महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleविद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण जोपासून समृद्ध व्हावे- सौ. नमिता कीर
Next articleमंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला! उद्या होणार शपथविधी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here