Home वाशिम वाशिम जिल्ह्यात खळबळ एक हजाराच्या लाचप्रकरणी महावितरणचा लाईनमन एसीबीच्या जाळ्यात

वाशिम जिल्ह्यात खळबळ एक हजाराच्या लाचप्रकरणी महावितरणचा लाईनमन एसीबीच्या जाळ्यात

209
0

आशाताई बच्छाव

IMG_20231108_062049.jpg

💥ब्रेकिंग💥
शेतात लावलेल्या नवीन डीपी ला वीज जोडणी करून देण्यासाठी 1000 रुपयांची लाच मागणाऱ्या लाईनमनला ACB वाशिम च्या पथकाने रंगेहाथ पकडले, लगातार होत असलेल्या कारवाईने वाशिम जिल्ह्यात खळबळ एक हजाराच्या लाचप्रकरणी महावितरणचा लाईनमन एसीबीच्या जाळ्यात
वाशिम (गोपाल तिवारी)- तक्रारदाराच्या शेतातील डीपीचे तार फिटींग केल्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयाची लाच मागणी प्रकरणी रिसोड तालुक्यातील रिठद महावितरणच्या सब डीव्हीजन अंतर्गत आसेगाव पेन येथे कार्यरत टेक्निशियन लाईनमन कुणाल मोहनसिंग छार (वय ३५) हा ७ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आरोपीला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी तक्रारदाराच्या शेतातील डिपीचे तार फिटींग केल्याचा मोबदला म्हणून आरोपी कुणाल छार याने फिर्यादीस १००० रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरुन तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात रितसर तक्रार नोंदविली. एसीबीने विभागाने केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपीने तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष १००० रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुध्द रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सक्षम अधिकारी महावितरणचे कार्यकारी अभियंता, सापळा व तपास अधिकारी एसीबीचे पोलीस निरिक्षक सुजीत कांबळे, पर्यवेक्षण अधिकारी गजानन शेळके, सापळा कार्यवाही पथक पोहवा. आसिफ शेख, योगेश खोटे, राहुल व्यवहारे, रविंद्र घरत, चालक नावेद शेख आदींनी पार पाडली. त्यांना एसीबीचे पोलीस अधिक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक देविदास घेवारे अमरावती विभाग यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे पोलीस उपअधिक्षक यांनी केले आहे.

Previous articleपोहाणे सोसायटीच्या चेअरमनपदी नंदू भामरे यांची निवड
Next articleटेंभुर्णी ग्रामपंचायत नूतन सरपंच सौ. सूरजाताई बोबडे यांनी घेतला कामाचा आढावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here