• Home
  • आमच्या पुण्यात “चिनी” बसेस नकोच ! पुणेकर आणि महापालिकेचा मोठा निर्णय.. ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

आमच्या पुण्यात “चिनी” बसेस नकोच ! पुणेकर आणि महापालिकेचा मोठा निर्णय.. ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 आमच्या पुण्यात “चिनी” बसेस नकोच ! पुणेकर आणि महापालिकेचा मोठा निर्णय..🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕:- भारत-चीन सीमेवर तणाव आहे. चिनी सैनिकांच्या हल्ल्यात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. परिणामी देशभरात चिनी वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतला जात आहे. त्यांना विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतही महत्त्वाचा निर्णय झालाय.

पीएमपीच्या ताफ्यात 350 ई-बसेस घेण्याच्या ठरावाला पीएमपीच्या संचालक मंडळाने सोमवारी स्थगिती दिली. त्याचप्रमाणे 50 मिडी बससेसची खरेदी पुणे महापालिका करणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी झाली. महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, पीएमपीचे संचालक शंकर पवार, पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
पीएमपीच्या चालकांना सर्व शासकीय खात्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा प्रस्ताव या वेळी मंजूर करण्यात आला. ज्या शासकीय विभागांकडून मागणी येईल त्यांना पीएमपी’चे चालक पुरविण्यात येणार आहेत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आणि निविदा प्रक्रियेमध्ये चिनी कंपन्या सहभागी होण्याची शक्यता असल्याने 350 ई बस घेण्याचा ठराव रद्द करावा, असा प्रस्ताव होता. परंतु, या बाबत अभ्यास करून निर्णय घेऊ, तो पर्यंत निविदा प्रक्रिया लांबणीवर टाकू, असे संचालक मंडळाने सांगितले. शहराच्या मध्य भागात 10 रुपयांत बस प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी 50 बसची खरेदी पुणे महापालिका करेल, असे महापौर मोहोळ यांनी संचालक सांगितले. त्या नुसार आता पुढील प्रक्रिया होईल..⭕

anews Banner

Leave A Comment