Home सोलापूर टेंभुर्णी ग्रामपंचायत नूतन सरपंच सौ. सूरजाताई बोबडे यांनी घेतला कामाचा आढावा

टेंभुर्णी ग्रामपंचायत नूतन सरपंच सौ. सूरजाताई बोबडे यांनी घेतला कामाचा आढावा

103
0

आशाताई बच्छाव

IMG_20231108_154943.jpg

टेंभुर्णी ग्रामपंचायत नूतन सरपंच सौ. सूरजाताई बोबडे यांनी घेतला कामाचा आढावा

सोलापूर
टेंभुर्णी ग्रामपंचायत नूतन सरपंच सौ. सूरजाताई बोबडे यांनी स्व.कृष्णात दादा बोबडे, स्व.सुभाष दादा कुटे व स्व. नानासाहेब हंबीरराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व आशीर्वाद घेऊन त्यांच्या पहिल्या दिवसाच्या कामाची सुरुवात केली.

टेंभुर्णी ग्रामपंचायतमध्ये खूप दिवसांपासून पाण्याची व्यवस्था नव्हती. ग्रामपंचायत ऑफिसवरील पाण्याची टाकी सुद्धा चोरीला गेली असल्याची तेथील कर्मचाऱ्यां कडून माहिती मिळताच तात्काळ सरपंच सौ. सुरजाताई बोबडे व सर्व सदस्यांच्या प्रयत्नातून पहिल्याच दिवशी नवीन पाण्याची टाकी बसविण्यात आली.
काल आपण टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकली आणि पहिल्या दिवसापासूनच कामाला सुरुवात देखील केली.
कारण हेच आपल्या गावाचे नवे वास्तव आहे.
मी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून त्यांचे काम समजावून घेत पुढील काळात टेंभुर्णी स्वच्छ ठेवण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्वच्छता आणि विकासाकडे वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.हा एक नवीन पैलू आहे,आपल्या गावासाठी एक नवीन सुरुवात आहे. आपण सर्वजण नवीन स्वच्छ आणि समृद्ध टेंभुर्णीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत.

Previous articleवाशिम जिल्ह्यात खळबळ एक हजाराच्या लाचप्रकरणी महावितरणचा लाईनमन एसीबीच्या जाळ्यात
Next articleसंतेश्वर ज्ञान सांस्कृतिक भवनात शिव महापुराण कथे पारंपरिक कार्यक्रमात संतांची बैठक पार पडली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here